📰 ताज्या घडामोडी

अपर पोलिस अधीक्षक यांची तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीमध्ये खरपुडी शिवार मोठी कारवाई, खरपुडी शिवारात अवैध वाळू साठ्यावर धाड अंदाजे 300 ते 350 ब्रास वाळू जप्त

Shamsundar chittoda
16 जून 2026⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना तालुक्यातील खरपुडी शिवार येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळूवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान अंदाजे ३०० ते ३५० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक साठवणुकीविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

महसूल विभागाच्या समन्वयाने वाळू साठ्याचे मोजमाप करून त्याची किंमत निश्चित करण्यात येणार असून संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व साठवणुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सपोनी योगेश खटकळ, पोलीस अंमलदार गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात