📰 ताज्या घडामोडी

सिंगोना येथील मयत पांडुरंग कदम यांच्या वारसाला एसबीआय बँकेकडून ४० लाखांचा विमा धनादेश सुपूर्द,दोन हजार रुपयांच्या पॉलिसीने कुटुंबाला दिला आर्थिक आधार

Shamsundar chittoda
10 जून 2026⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

तालुक्यातील सिंगोना येथील रहिवासी पांडुरंग अंजीराम कदम (वय ४२) यांचे गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंगोना पाटीवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अवघ्या दोन हजार रुपयांचा प्रिमियम भरून जनरल इन्शुरन्स अपघाती विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या या अपघाती निधनानंतर बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अत्यंत तत्परतेने त्यांच्या वारसाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मंजूर केला.

या मंजूर विमा रक्कमेचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश मयत पांडुरंग कदम यांच्या वारसदार पत्नी शिला पांडुरंग कदम यांना १० जून २०२६ रोजी परतूर येथील 'एसबीआय' मुख्य शाखेत मुख्य शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपलेल्या कदम कुटुंबाला या कठीण काळात बँकेच्या दोन हजार रुपयांच्या पॉलिसीमुळे चाळीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक छत्र लाभले आहे. या विमा रक्कम धनादेश वितरणप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक विजय राम, उपप्रबंधक हर्षवर्धन मुन, संध्या रसाळ, प्रज्वल सावंत, योगेश धानुरे, आकाश राजनकर, अशय नानवटकर, वैष्णवी क्षीरसागर, शिवाजी कुलकर्णी, मुलगा सहदेव कदम, भाऊ विठ्ठल कदम,भरत सुरुंग यांच्यासह बँक कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाने व बँकेच्या ग्राहकांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्यातील सुरक्षेसाठी अशा विमा योजनांचा लाभ घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी बँक प्रशासनाच्या वतीने मुख्य शाखा व्यवस्थापक विजय राम यांनी केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात