📰 ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी अर्शद बागवान

Shamsundar chittoda
3 जून 2025⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या आदेशाने व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी अर्शद रज्जाक बागवान यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी युवक संघटना वाढीसाठी व सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे

यावेळी, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आमदार अरविंद चव्हाण, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस कय्युम खान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी, ध्येय- धोरणे ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याबरोबरच, युवकांचे विधायक विचारांचे संघटन उभारुन पक्ष मजबुत करण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे त्यांनी नियुक्ती दरमयान नवनिर्वाचीत प्रदेश सचिव अर्शद रज्जाक बागवान यांनी बोलतांना व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विस्तारासाठी दिलेले योगदान, तसेच युवकांचे संघटन पाहता ही जबाबदारी देवून त्यांचा पक्षाने सन्मान केला आहे. राज्यात युवकांचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी आपण येत्या काळात अथक परिश्रम घेवून ही जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. अंगी युवा नेतृत्व गुण असलेल्या अर्शद रज्जाक बागवान यांनी युवकाचे मोठे संघटन उभे केले आहे. अर्शद बागवान यांना कुठलिही राजकीय पार्श्‍वभुमी नसतांना त्यांनी स्वकर्तृत्वावर पक्षात आपली वेगळी आणि स्वच्छ प्रतिमा तयार करून आणी त्यांचे असलेले पक्षासाठी योगदान पाहुन त्यांच्यावर पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण , जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अमर पाटील, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खय्युम खान, जालना तालुका अध्यक्ष संतोष ढेंगळे, सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे , गणेश भुतेकर, संभाजी भुतेकर,लखन तुरे,आकाश शिंदे यांनी नवनिर्वाचीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव अर्शद बागवान यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात