📰 ताज्या घडामोडी

शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद, निवडणुका असो अथवा नसो पक्ष संघटन अत्यंत महत्वाचे - अंबादास दानवे

Shamsundar chittoda
1 जून 2025⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

कार्य असो, यासाठी अत्यंत महत्वाचे असते. पक्ष संघटन मजबुत असेल तर आपण सर्व निवडणुका अत्यंत चांगल्या प्रकारे जिंकू शकतो, या करिता सर्वच

पदाधिकार्‍यांनी आपआपल्या क्षेत्रात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व नागरिकांना आपला पक्ष सदैव उपयोगी ठरणारा असला पाहिजे. त्यांच्या सुख-दुःखात पदाधिकारी उभा असला पाहिजे

तसेच आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या अत्यंत छोट्या-छोट्या कामी त्याची मदत केली पाहिजे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

यांनी केले.

जालना शहरातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,उपनेते लक्ष्मणराव वडले,उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ,माजी सभापती मुरलीधर थेटे, बाबुराव पवार,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश काठोठीवाले, घनश्याम खाकीवाले, बाजार समितीचे माजी संचालक तुळशीदास काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल मधबुन व हॉटेल अमित

येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कार्याच्या आढावा बैठका घेतल्या. या बैठकीस प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आगामी निवडणुका आपल्यातीलच अनेक जण उमेदवार असणार आहेत व भावी लोकप्रतिनिधीही आपल्यातील असतील. या करिता प्रत्येकांनी पक्ष संघटनेचे आवडीने काम करावे,

असे आवाहन करत ते म्हणाले की, कोणतेही काम करतांना केवळ पदासाठी स्वार्थासाठी न करता जनसेवेसाठी करावे, असेही दानवे म्हणाले. संघटनेतील प्रत्येक पदाधिकार्‍यांची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येकाने

आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे. तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो. येणार्‍या निवडणुका हे महत्वाचे उद्दष्टि आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येकांनी झटून काम केले पाहिजे, असेही अंबादास दानवे म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर म्हणाले की, जालना शहरातील दोन्ही बैठकांना उपस्थित पदाधिकारी हे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू आहेत.

पक्षाच्या अत्यंत कठीण काळात हे सर्व पक्षाच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभे राहिलेले आहेत. शहरातील तिनही शहरप्रमुख अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत असून संघटन मजबुत करण्याचा कसोसिने प्रयत्न करीत आहेत. उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकार्‍यांनी आपआपल्या क्षेत्रातील सर्व बुथप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख या सर्व नियुक्त्या झाल्याची खात्री करावी व आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या

क्षेत्रातील निवडणुक याद्यांचे वाचन करावे,स्थलांतरीत मतदार, मृत मतदारया सर्व बाबी आवर्जुन पाहाव्यात. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपणास अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले असून पक्ष संघटना मजबुत होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी कोणतेही

अमिषाला बळी न पडता निष्ठेने पक्षाचे कार्य करावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे, सखाराम मिसाळ,जे.के. चव्हाण, विजय शेंदरकर, रविकांत जगधने,राजु खर्डेकर, महादेव कावळे,जान महम्मद कुरेशी, निखील धारेगावकर, घनश्याम कुमठे, नंदुसिंग राजपुत,

बजरंग राजपुत, शेख नईम, अनिल अंभोरे, अजय रोडीये, गजानन मगर, जयदेव काळे,दर्शन चौधरी, जय छाबडा, राम जाधव, अशिष बोकण, परमेश्वर घोलप, तुकारामभुतेकर, सय्यद इम्रान, गणेश लाहोटी, दिपक भालेराव, कुरकण सय्यद, आकाश

टेकूर, रमेश तुंगेवार, शुभम गायकवाड, अंकित बाहिती, गोपीकिशन उबाळे,कृष्णा तापडीया, राजु वैद्य, अरुण हिवराळे, तुळजाराम माधवले, चुन्नूसिंग

पहेलवान आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान यावेळी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव रजनीकांत

इंगळे व जालना येथील शरद पवार यांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश केला.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात