परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आणि शिवसेनाच पुन्हा भगवा फडकणार असून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील असे परतुर येथील शिवदुत, बूथ प्रमुख, व शिवसेना पदाधिकारी मेळाव्या प्रसंगी परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे यांनी आपले वीचार मांडले
परतुर येथे परतुर /मंठा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला असता अध्यक्ष म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, महिला आघाडी प्रमुख कालींदाताई ढगे युवा सेेेना जिल्हा प्रमुख अजय कदम हे होते. पूढे बोलताना साळुंखे म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आताही शिवसेनेचाच उमेदवार या परभणी मतदार संघाला दिला जाणार आहे यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेचेही निवडणुकीसाठी उमेदवार दिले जातील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जिल्हाप्रमुख अग्रवाल यांनी केलेल्या कार्याचा आढावा सकारात्मक दिला जाईल. यांच्या कामाची पावतीही यांना मिळेल या मेळाव्यामध्ये विविध पदाधिकारी यांच्याकडून पक्ष वाढीचा आढावा ,पदाधिकारी कडून घेण्यात आला यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल महिला जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक परतुर विधानसभा संघटक विजयकुमार गिरी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले ,परतुर तालुका प्रमुख अमोल सुरूंग, मंठा तालुकाप्रमुख उदयसिंग बोराडे, तालुका संघटक विजयकुमार गिरी, वैद्यकीय मदत कक्षाचे विधानसभा प्रमुख शिवाजी तरवटे, शहर प्रमुख दीपक हिवाळे ,उपतालुकाप्रमुख नितीन राठोड, सोपान कातारे ,विभाग प्रमुख गजानन आकात ,सरपंच दिनकर शेंडगे ,युवासेना तालुका प्रमुख अविनाश कापसे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख शेख खाजा, नसीर खान पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी केले तर आभार शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शिवाजी तरवटे यांनी मानले, या मेळाव्यास परतूर मंठा तालुक्यातील बुथ प्रमुख, शिवदूत व शिवसैनिक पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परतूर येथील शाहेद सय्यद व इतर वीस तरुणांनी प्रवेश घेतला तसेच या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांना सुद्धा नियुक्ती पत्राचे वाटपही करण्यात आले.
आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा