📰 ताज्या घडामोडी

आशा व गट प्रवर्तकांचा जिल्हा परिषदेसमोर दोन तास रस्ता रोको,मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

च
Shamsundar chittoda
7 नोव्हेंबर 2023•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दिनांक 7 नोव्हेंबर रोजी आशा व गट प्रवर्तक यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्ता रोको करून दोन तास जिल्हा परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले. व निर्धार केला की,जो पर्यंत मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आशा व गट प्रवर्तक यांचा संप सुरूच राहील.

दि. 18 ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रातील 70 हजाराच्या व 3600 चे गटप्रवर्तक आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. आशा व गटप्रवर्तक अल्प मानधनावर काम करतात. इतर काही राज्यांमध्ये गटप्रवर्तकांना सुपरवायझरचा दर्जा असून त्यांना किमान वेतन मिळते. आणि आशांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन मिळते. कोरोना काळात आशाने आपला जीव धोक्यात घालून जनतेला आरोग्य सेवा दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेले विशेष भत्ते महाराष्ट्र सरकारने आपल्या आशा व गटप्रवर्तकना दिलेले नाही.यासह स्थानिक मागण्या देखील प्रलंबित आहे.त्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी आश्वासन देऊनही त्या मागण्या पूर्ण न केल्याने आज सत्याग्रह आंदोलन करण्याची वेळ आली.

यावेळी कामगार नेते,संघटनेचे अध्यक्ष अण्णा सावंत,शेतमजूर युनियनचे राज्य सचिव बळीराम भुंबे, आशा व गटप्रवर्तक फेडरेशन चे राज्य पदाधिकारी शिवाजी कूरे यांनी सभेला संबोधित केले.यावेळी संघटनेच्या सचिव सरिता शर्मा,शेतमजूर युनियन चे राज्य अध्यक्ष मारोती खंदारे, सिटू जिल्हा सचिव ॲड.अनिल मिसाळ,चंद्रकला पोपटे,स्वाती दुधाने,दीपा रगडे,अनिता धांडगे,अरुणा बांगर,निता राठोड, शीला बोर्डे, अशामती गायकवाड,सुजाता छाडिदार,उज्वला राठोड,मिनाक्षी मोरे,परवीन शेख,चंद्रभागा कलाल,जयश्री गाढे,मंगल पवार,यांच्यासह हजारो आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 नोव्हेंबर 2023
मा बागेश्वरी च्या दहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ.

मा बागेश्वरी च्या दहाव्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात