📰 ताज्या घडामोडी

देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल परतुर येथे बाल दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.

च
Shamsundar chittoda
30 जून 2023•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण

शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलयेथे आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंध्येला बाल दिंडी कार्यक्रम घेण्यात आला. वरील कार्यक्रमाची सुरुवात पालखीच्या पूजनाने करण्यात आले पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव चव्हाण संचालक संतोष चव्हाण, सुबोध चव्हाण ,सचिन चव्हाण सौ . भाग्यश्री चव्हाण, हर्षदा चव्हाण, प्राचार्य गजानन कास्तोडे यांच्या हस्ते करण्यात आले .

सदरील दिंडी मध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, वारकरी

अशा विविध वेषभूषा साकारल्या,शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली. डोक्यावर तुळस, हातात टाळ,गळ्यात तुळशीची माळ व ग्यानबा

तुकारामच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. चिमुकल्यांनी दिंडीत अभंग, भजने, भारुडे म्हणत तर मुलींनी

फुगड्या खेळत सहभाग घेतला. सदरील दिंडी शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर विद्यार्थ्यांना वारीतील रिंगण सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव यावा याकरिता रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील रिंगण सोहळा विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पाडला

याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शाळेचे प्राचार्य गजानन कास्तोड, शिनगारे मॅडम, लहाने मॅडम, नयना मॅडम, बेडेकर मॅडम, काळे मॅडम, दसमले मॅडम, पोरवाल मॅडम प्रा. प्रदीप चव्हाण, प्रदीप साळवे, बाळासाहेब कदम ,नाना डोने, महादेव नळगे,राजेश कार्लेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 जून 2023
परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश    ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात