📰 ताज्या घडामोडी

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

Shamsundar chittoda
26 जून 2023⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

येथील साईबाबा मंदीराजवळील पेट्रोलपंपवर रात्री उभा केलेला कापसाने भरलेला अयशर ट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि २२ मे रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस घडली होती. या प्रकरणी परतूर पोलिसांनी अयशरसह आरोपीचा पोलिसांनी शोध लावून आरोपीच्या मुसक्या आवळून चोरी गेलेल्या मालाची रक्कम आरोपीकडून वसूल करून गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार पोलिसांनी जप्त केली आहे.

अयशरसह कापूस चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक करतांना पोलिस नाईक अशोक गाढवे, शमवेल गायकवाड, अमोल गायकवाड आदि दिसत आहेत. ...

काकडे कंडारी येथील शेतकरी भगवान नामदेव काकडे यांनी दि २१ मे रोजी रोजी संध्याकाळी दहा वाजेच्या दरम्यान कापुस आयशर गाडी क्रमांक एमएच २० सीटी ३९९० मध्ये एकरुखा येथे भरुन आणलेला आयशर चालक समशेर खाँन पठाण यांनी कापसाने भरलेले आयशर हे साईबाबा मंदीराजवळ पेट्रोलपंपवर रात्री साडेदहा वाजता लावुन घरी गेलो होतो. सकाळी आयशर लावलेल्या ठिकाणी आला असता कापसाने भरलेले आयशर हे चोरीला गेल्याचे कळले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या घटनेच्या तपासची सूत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना अशोक गाढवे, शमवेल गायकवाड, अमोल गायकवाड, यांनी तपास करून अयशरचा मागोवा घेत. अयशरचे धागेदोरे हाती लागल्याने चाळीसगाव तालुक्यात सोलापूर - धुळे रोडवर दहिवद शिवारात चोरट्याने कापसाने भरलेला अयशर त्यातील कापसाची चोरी करून रिकामा ट्रक रस्त्याच्या कडेला सोडून दिला. पोलिसांनी यांचा शोध घेऊन दि २९ मे रोजी ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला होता. अयशर मधील कापूस चोरट्यांनी विक्री करून फरार झालेले असतांना पोलिसांनी शोध घेऊन आरोपी दिपक शामराव लांडगे, वय २१ वर्ष रा. पांगरा ता.घनसावंगी, दिलीप महादु चौधरी वय ३८ वर्ष रा.कुंजर ता. चाळीसगाव, अनिल ईश्वर पाटील वय ३६ वर्ष रा.निपाणी ता.पाचोरा जि.जळगाव, ह.मु. चिकलठाणा औरंगाबाद यांचा शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आली. त्याचे ताब्यातुन त्यांनी कापुस विक्री केलेले पाच लाख रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आले. पोलिसांना चोरी गेलेले अयशरसह कापूस विक्रीतून चोरट्यांना आलेली रक्कम जप्त केली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, पोलीस निरीक्षक एस.आर.कौटाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गाढवे, पोलीस अंमलदार शमुवेल गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांनी केली आहे. या कारवाईने परतूर पोलिसांची मान उंचावली आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात