📰 ताज्या घडामोडी

शेतकरी, कष्टकरी,महीला सबलीकरण या सह सर्वसामान्या चा वीचार करानारा अर्थसंकल्प- मा . मंत्री आ. बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
9 मार्च 2023⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन जाणारा असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिला युवक उद्योग या सर्वांना उभारी मिळणार असून, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद,

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करणार,

कोकणातील पाणी मराठवाड्यात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणले जाणार,मराठवाड्यासाठी घर घर जल योजना,शेतकरी सन्मान योजनेत केंद्राच्या 6000 हजाराबरोबरच राज्यही देणार 6000 त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 1200 हजार रुपये मदत,शेतकरी ,महिला, युवकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प,अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 1500 रुपयांची वाढ,राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांना होणार लाभ,महिलांना एसटी बस तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सूट,महिलांना सशक्त करणारा अर्थसंकल्प,महिला बचत गटांना करणार सक्षम,माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत चार कोटी महिलांची मुलींची आरोग्य तपासणी करणार,मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात, जन्मानंतर 5000 तर पहिल्या वर्गात गेल्यानंतर चार हजार तर सहाव्या वर्गात 6000 अकरावीत आठ हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मिळणार 75000,शेतीला समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी योजने अंतर्गत 29 हजार 163 कोटी रुपयांची तरतूद,मोदी घरकुल योजनेअंतर्गत 10 लाख घरे गरिबांना उपलब्ध होणार,आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 01 लाख 50 रुपया ऐवजी 05 लाख रुपयांची मदत रुग्णांना होणार,

राज्याला खऱ्या अर्थाने समृद्धीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प,

माजी मंत्री आमदार बबनराव लोणकर

घर घर जल या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार असून मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पाचा पाठपुरावा करत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून देवेंद्रजींनी व्यक्त केलेला आहे

महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत बचत गटांसाठी ही घसघशीत अशा तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आले असून राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली असून आता यापुढे पाच हजार पाचशे इतके मानधन अंगणवाडी सेविकांना मिळणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

यापुढे महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट देण्यात आलेली असून

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार लाख घरे नव्याने बांधण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्रजी यांनी म्हटले असून हा निर्णय स्वागतार्य असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात ७०० दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राज्यभरात ७०० दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दिली जाणारी दीड लाखाच्या मदतीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली असून आता ही मदत पाच लाख रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार तर आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले

हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असून यातून शेतकरी महिला युवक दिन दलित पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार असून या संकल्पचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भरभरून कौतुक केले आहे

शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक मदत करत असते या मदतीत आता राज्य सरकारी वाटा उचलणार असून राज्याचे सहा आणि केंद्राचे सहा असे 12 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प शेतकरी भिमुख असून राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आभार मानले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात