📰 ताज्या घडामोडी

बंधु प्रेमासाठी राज्य त्याग करणार्‍या भरताचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा- ह.भ.प. रामराव महाराज ढोक

च
Shamsundar chittoda
11 फेब्रुवारी 2023•⏱️ ३ मिनिटे वाचन•
WhatsApp

बंधू प्रेमासाठी रामाने राज्य सोडले भरताने राज्यपद व आपण मात्र एकमेकांविरुद्ध वेगळ्या दिशेने वागतो एखादी घटना मनाविरुद्ध घडली तर अनेकांच्या घरी कलह निर्माण होतो मिथिलेच्या राजा ची कन्या विश्वाच्या राजा ची पत्नी १४ वर्ष वनवासात कशी राहिली हेच आपण शिकले पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. रामराव महाराज ढोक यानी केले गरिबांना मदत दानधर्म, गुरुमाता पिताचा सम्मान व आईची सेवा केल्यास आपल्याला निश्चितच आपल जीवन सार्थक झाल्या सारखे वाटेल असे ही ते म्हणाले मा. आ. सुरेशकुमार जयलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने परतूर येथील अयोध्या नगरीत सुरु असलेल्या रामकथेच्या चौथ्या दिवशी ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी राम वनवासात जात असतानाचे वर्णन सदर्भासह इष्टांत देऊन विशद केले. या वेळी भाविक मंत्रमुग्ध होऊन कथा श्रवण करताना दिसत होते.

" उठा जागे व्हावे, आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची" या संत नामदेव महाराजांच्या अभंगावर ढोक महाराजांनी या वेळी चिंतन मांडले. महाराज म्हणाले, जन्माला येणार्‍या प्रत्येकाची श्वसन प्रक्रिया सुरु आहे. बसलेले असताना मिनिटाला 12 वेळा, चालताना 18 वेळा, झोपेत 24 आणि मद्यप्राशन केल्यानंतर 30 वेळा श्वास आत बाहेर सोडला जातो, असे दिवसभरात 21 हजार 600 वेळा श्वास आत बाहेर सोडण्याची प्रक्रिया होते. तोपर्यंत त्याला त्याचे महत्त्व कळत नाही. मात्र; मृत्यूनंतर ही प्रक्रिया पूर्णपणे थांबते. त्यावेळी कितीही पैसे मोजले तरी देखील पुन्हा श्वसन प्रक्रिया पूर्ववत होत नाही. म्हणून मानवाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आयुष्य आहे. संसार हा समुद्र आहे. संत स्वतः जागे असतात, म्हणून ते आपल्याला जागे व्हा असे सांगतात, त्यांना तो अधिकार आहे. आपण सगळे जागे आहोत. संसारात परमार्थासाठी आपण सगळे झोपेत आहोत. जन्माच्या व्यथा चुकविण्यासाठी संत उपदेश करतात. परमार्थाचे विस्मरण होऊ देऊ नका. जागे व्हा, आणि परमार्थ करा. संसार करत असताना धन, घर, पत्नी, पुत्र, बंधू, सगेसोयरे, समाज याची गरज आहे. मात्र, या सर्व गोष्टी मिथ्य आहेत. त्या आपल्याला सत्य वाटतात आणि परमार्थ हा सत्य आहे. तो आपल्याला मिथ्य वाटतो. सत्य ते मिथ्य व मिथ्य ते सत्य वाटण्याचे कारण म्हणजे माया आहे. माया असलेले लपवते आणि नसलेले दाखवते. मी आणि माझे म्हणणे म्हणजेच माया होय. ज्याला आपण माझे म्हणतो ते सर्व इथेच राहते. आयुष्याचे सत्य संतसंगती व परमार्थ यातच आहे. त्यामुळेच मुक्ती मिळू शकते असे ह.भ.प. रामराव महाराज ढोक शेवटी म्हणाले.

कथेच्या सुरवातीला मा.आ.सुरेशकुमार जेथलिया ,मा.नगरध्यक्षा विमलताई जेथलिया व समस्त जेथलिया परिवाराच्या वतिने आरती करण्यात आली. तर आज सांगतेच्या आरतीच्या वेळी जेथलिया परिवारासह महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री,मा.ना.संदिपानजी भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महानंदा दूधसंघ चे संचालक नंदलालजी काळे,जयप्रकाशजी चव्हाण,मोहनजी अग्रवाल,प्रेमसेठ लोहिया,श्रीकिशनजी पाल्लोड,गोपालदासजी राठी हिंगनघाट,लोहियाजी कुंभार पिंपळगाव,पप्पू सेठ दहाळ,सत्यनारायानजी सारडा,सुभाषजी बाहेती अंबाजोगाइ,माधवराव मामा कदम,बद्रीभाऊ ढवळे,मदनलालजी चांडक,कांतासेठ सोमणी,जनार्धन मिंड,अचितराव सोळंके,अंकुशराव बीडवे,भगवानराव तणपुरे,ज्ञानोबा पवार,बांडगे साहेब,दामोधार बालकुंड,प्रभाकर खंदारे,डॉ.संदीप चव्हाण,डॉ.दत्तात्र्य नंद,बालरोग तज्ञ डॉ.मंत्री, डॉ.भानूदास कदम, डॉ.कमलचंद सकलेजा,सुभाषराव जोगदंड,संदिपान खरात,राहूल सातोनकर, मनोहर खालापुरे,बबनराव उन्मुखे,महेश होलाणी,तालुका अध्यक्ष बाबाजी गाडगे,जि.प.सदस्य इंद्रजीत घनवट,अविनाश शहाणे,सचिन लिपने,पांडुरंग गाडगे,यांच्या सह परिसरातील नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.

सांयकाळी याच ठिकाणी रामायनाचार्य ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा,यांचे किर्तन पार पडले यावेळी मोठया संखेने महिला पुरुष भक्तांची उपस्थीती होती

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→11 फेब्रुवारी 2023
जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा- रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज

जीवनात वावरतांना सर्वांचे हिताचे रक्षण करा- रामनाचार्य ह.भ.प.ढोक महाराज

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात