📰 ताज्या घडामोडी

जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात मोठा अपहार झाला असल्याची तक्रार वीकास बागडी यांनी केली

Shamsundar chittoda
19 सप्टेंबर 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना प्रतिनीधी समाधान खरात

जालन्यातील १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपये निधीच्या कामात अपहार मोठा अपहार झाल्याची पत्रकार तथा जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी राज्यपालासह सर्व संबंधिकांकडे एका निवेदनाव्दारे तक्रार केली असून सदर निवेदनाच्या शेवटी जीवीतास धोका असल्याचेही नमूद केले आहे.

या संदर्भातील निवेदनात बागडी यांनी म्हटले आहे की, जालना शहराच्या जल वितरण करीता शासनाने १३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांचा निधी खर्च करुन नगर परिषद हद्दीत जन सामान्य जनतेसाठी ४१९ किलो मीटर लांबीची पाईप लाईन आणि ९ जल कुंभ आदी जल वितरण करीता कामाचा करारनामा मुख्याधिकारी नगर परिषद, जालना यांनी आर. ए. घुले कंत्राटदार पालघर जि. ठाणे यांनी सन २०१६ (दि. २३ जून २०१६) मध्ये केला होता. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषद जालना यांनी मे. फोरट्रेस इन्फ्रास्टक्चर ऍडव्हायचरी कन्सलंटस् मुंबई यांची योजनेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन समिती म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेची सर्व कामे आराखड्यानुसार पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. परंतू सदर संस्थाने आपली कोणतीही जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले नाही. त्यामुळे आर. ए. घुले यांनी करार पत्र आणि अंदाजपत्रकानुसार काम न करता थातूर- मातूर पध्दतीने काम केलेले आहे. कामात मोठी अनियमिता दिसून येत आहे.१३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांच्या निधीमध्ये मोठा अपहार केला आहे. सदर कामाची पाहणी आणि अंदाजपत्रक अनुसार काम करुन न घेता फोरट्रेस इन्फ्रास्टक्चर कंपनीने आर. ए. घुले कंत्राटदाराला बोगस मोजमाप लिहून दिले आहे. नगर परिषद प्रशासनाचे नगर अभियंता, लेखापाल किंवा मुख्याधिकारी यांनी सदर कामाविषयी एकही आक्षेप न घेता आर. ए. घुले कंत्राटदाराला बिल आणि रक्कम मंजूर करुन दिली आहे.१३२ कोटी ९७ लाख ७२ हजार २२९ रुपयांचा निधी खर्च करुन सुध्दा जालना शहरातील जनतेला कोणताही फायदा झाला नाही. संबंधित कंत्राटदार कंपनी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी योजनेमार्फत फक्त अपहार केल्याचे दिसून येत आहे

तरी साहेबांना माझी लेखी विनंती की, वरील संबंधित कामाविषयी चौकशी करुन योग्य तो गुन्हा दाखल करावा, करिता मी माझे प्रथम अर्ज आपल्याकडे सादर करत आहे. सदर प्रकरणामध्ये पाठपुरावा व न्यायाकरीता मी शासनासमोर हजर राहण्यास तयार आहे

अशी विनंती वीकास बागडी यांनी केली आहे या प्रकरणात माझ्या जीवीतास सुध्दा धोका असल्याचे निवेदनात सांगितले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात