📰 ताज्या घडामोडी

मंठ्यात जि.प. नुतन उर्दू शाळेत शिक्षकाची रिक्त पदे त्वरीत भरावी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना पालकांची मागणी

Shamsundar chittoda
16 ऑगस्ट 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दि.१६ शहरातील जि.प. उर्दू प्रा.शाळा नूतन शाळेत इ.१ ते ८ पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी ३५३ वर्ग १ ते ५ पर्यंत २२५ विदयार्थी व वर्ग ६ ते ८. १२८ विद्यार्थी असे एकूण विद्यार्थी ३५३ आहेत त्यासाठी आर.टी.ई २००९ नुसार शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीचा निवेदन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने

गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जालना मा. शिक्षणधिकारी जि.प. जालना मा. शिक्षण संचालक पुणे मा. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. केंद्र प्रमुख नूतन मंठा यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख ए. आर. कुरेशी, गटसमन्वयक के. जी. राठोड, हाफेज शबाब बागवान जिल्हा परिषद कन्या शाळाचे उपअध्यक्ष अशपाक शेख यांची उपस्थिती होती.

या निवेदनत म्हटले आहे की

शासनाचे नियमानुसार ३० विद्यार्थीवर एक शिक्षक मान्य असून आमच्या शाळेसाठी हा नियम लागू नाही का ? शासनाचे नियम फक्त कागदावर पुरतेच आहेत का ? असा प्रशन निर्माण केला आहे.

या निवेदनात शासनाला ईशारा देण्यात आला आहे की जि.प. उर्दू प्रा. शाळा नूतन या शाळेत शासनाचे नियमानुसार शिक्षक दिले नाही तर शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून शाळेस कुलूप ठोकण्यात येईल तरी तात्काळ जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून याची नोंद घ्यावी असे शेवटी या निवेदनात म्हटले आहे .

यानिवेदनावर शाळा व्यवस्थापण समितीची अध्यक्षा नाजिया ईनुस कुरेशी, सलीम शेख, इमरान शिरगुल खान, जमिल खान, सौ अनीसा कुरैशी , हाफेज जब्बार शब्बीर शाह , मौलाना आहद , हाफेज साकीब, यांच्यासह पालक वर्गच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात