📰 ताज्या घडामोडी

दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध जोडल्यास गणित विषय सोपा- डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर ,आनंद विद्यालयात संपन्न झाली गणित विषयाची कार्यशाळा

Shamsundar chittoda
12 जुलै 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

दैनंदिन जीवनात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अनेक घटनांच्या माध्यमातून गणिताचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळते.गाणितातील आकडेमोडीची भीती मनात न बाळगता, गणिताशी बोला, त्याच्याशी मैत्री करा, गणित तुम्हाला आपलेले करील असे मत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी व्यक्त केले आहे.

येथील आनंद माध्यमिक विद्यालयात गणित विषयासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. गणित विषयाची विद्यार्थ्याना वाटणारी भीती आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. भोजनकर बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम, मुख्याध्यापिका सत्याशिला तौर-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती गणित विषय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तिला चालना देणारा, बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणारा विषय आहे. गणितात अनेक गमतीशीर बाबी समजून घेतल्यास विषय कंटाळवाणा न होता गमतीशीर होऊ शकतो. गणितातबाबतचा न्यूनगंड बाजूला ठेवून नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी गणिताचे अध्ययन केल्यास हा विषय समजण्यास सोपा होईल. शिक्षकांनी देखील गणिताचे अध्यापन करतांना विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करून गणिता बद्दल विद्यार्थ्याच्या मनात आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.जागतिक स्तरावर गणित विषयावर होणारी विविध संशोधने, प्रसिद्ध होणारे शोधप्रबंध या बाबत गणित शिक्षकाने सजग असले पाहिजे असे पुढे बोलतांना डॉ. भोजनकर म्हणाले. विविध गणिती क्रिया करतांना वापरण्यात येणाऱ्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना करून दाखविली. विद्यालयातील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक माऊली ढेरे, विक्रम भांडवलकर, अनुजा गारकर, उदिता उपाध्याय आदींची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात