📰 ताज्या घडामोडी

राज्यसभा निवडणुकीचा निकाल महा विकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी..

Shamsundar chittoda
11 जून 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

राज्यसभा निवडणुकीचा नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शनिवारी पहाटे निकाल आला.

राज्यातील सहा जागांपैकी भाजपला अनुक्रमे तीन शिवसेना, काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकली तत्पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिवसभराच्या गदारोळानंतर संध्याकाळी मतमोजणी थांबवण्यात आली होती .भाजप आणि महा विकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली तब्बल साडे आठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले त्यानंतर मतमोजणी सुरुवात करण्याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महा विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

माविआचे तीन उमेदवार तर भाजपची तीन उमेदवार जिंकले पहिल्या पसंतीच्या मतमोजणी मध्ये महा विकास आघाडीचे तीन उमेदवार भाजपचे उमेदवार तीन विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत .त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजय झाले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या समजल्या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिक यांनी संख्याबळ यापेक्षा अधिक मतांनी जिंकली महाडिक कुटुंबांनी गुलालाची उधळण केली. कोणाला मिळाली किती मते इम्रान प्रतापगडी-44, प्रफुल्ल पटेल -43,संजय राऊत-41, अनिल बोंडे- 48,पियुष गोयल-47, संजय पवार- 33,धनंजय महाडिक-42 महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैद्य ठरवले आहे दोन मतावर आम्ही आक्षेप घेतला होता मात्र कारवाई झाली नाही आयोगाने त्यांची बाजू मांडली.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात