📰 ताज्या घडामोडी

हेलस येथे श्रीराम मंदिर कलश रोहण सोहळा उत्साहात संपन्न

Shamsundar chittoda
9 एप्रिल 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

-दि..०८तालुक्यातील हेलस गावाची एक अनोखी ओळख आहे येथील पुरातन हेमाडपंथी व प्राचीन कलाकृती असलेले महादेव मंदिर, कालिंका देवी मंदिर, गणपती मंदिर व तसेच श्री दत्त मंदिर या सर्व मंदिरांची बांधकाम आणि कलाकृती बघून मन हरकून जाते तसेच हेलस या गावातील सर्व गावकरी आपली संस्कृती जपत दरवर्षी श्री गणेश उत्सव साजरा करतात गेल्या कित्येक वर्षांपासून चालत असलेलं एक गाव एक गणपती ही परंपरा अजूनही या गावात शांततेत पार पडत असते गावाच्या परिसरात बारा हनुमान मंदिरे असून प्राचीन वास्तू, परंपरा, धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवा साठी ओळखले जाणारे हे गाव आहे

तसेच या गावाच्या बाहेर उत्तरेला काही अंतरावर बऱ्याच वर्षांपूर्वी एक महिला शेतात जात असतांना तिला जमिनीतून काहीतरी आवाज आल्याचं जाणवलं त्यानंतर त्या महिलेने तिथे खोदल असता जमिनीच्या आतून श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता या तीन मूर्ती आढळून आल्या असे गावातील लोक सांगतात तेव्हा पासून गावाकऱ्यांनी एक छोटं मंदिर बांधून तिथे श्रीरामाच्या मंदिराची स्थापना केली होती पण काळानुसार ते मंदिर खूप जुनं झाल्यामुळे गावाकऱ्यांनी नवीन व भव्य असे श्रीरामाचंद्र प्रभूचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले काही वर्षापासून चालत असलेल्या ५१ फूट उंची असेलेलं मंदिर बांधून पूर्ण झाले व दि.७/४/२०२२ गुरुवार रोजी या मंदिराचा भव्य कलश रोहणाचा व श्री राम,लक्ष्मण, सीता आणि हनुमानच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचा कार्येक्रम पार पडला या कर्यक्रमाच्या निमित्ताने गावातून मूर्तिची भव्य मिरवणूक काढली व नंतर श्रीरामाच्या मंदिरापाशी महापूजा करून मंदिरावर कळस लावण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक फक्त उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात