📰 ताज्या घडामोडी

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, यंदाच्या जयंतीला नियमावली काय?====================

Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती (2022) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कोणताही सण, उत्सव हा नेहमीसारखा मोकळेपणाने साजरा करता आलेला नाही. कोरोनामुळे दोन वर्षातल्या प्रत्येक सण उत्सव, जयंतीवर काही ना काही निर्बंध राहिले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शिवजयंतीसाठी निर्बंध शिथिल असावेत अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर लोकांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मोठी दिलासा देत. ही नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंत धूमधडाक्यात पार पडणार आहे. या नव्या नियमावलीनंतर शिवभक्कांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर पुन्हा वाढल्याने शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक करावे लागले होते. मात्र लसीकरण झाल्याने आणि लोकांमध्ये चांगल्या प्रकारची इम्युनिटी तयार झाल्याने कोरोनाची तिसरी लाट जास्त झळ पोहोवू शकली नाही, पाहता पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लागताना दिसून आला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कडक केलेले निर्बंध पुन्हा शिथिल होऊ लागले आहेत. जग पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. तिसऱ्या लाटेल सुरूवातील मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे पाहून धडकी भरत होती. मात्र मुंबईने पुन्हा मुंबई पॅटर्न दाखवत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लावला.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात