📰 ताज्या घडामोडी

राजेश (भैय्या)टोपे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर -शिवाजी भालेकर (राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष)

च
Shamsundar chittoda
15 फेब्रुवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यंदा कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावताना केलेल्या लोकसेवेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल पेठे, विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकला क्षेत्रातल्या योगदाना बद्दल डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबला वादक पं. सुरेश तळवळकर आणि अदम्य साहस दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या सीताबाई काळु घारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सीताबाई घारे यांनी बिबट्याशी झुंज दिली हेाती. प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २१ हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी नाशिक मध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं १९९२ सालापासून विविध क्षेत्रातल्या येागदानाबद्दल एक वर्षा आड हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शिवाजी भालेकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनीं आमदार राजेश भैय्या टोपे साहेब यांचा सत्कार केला या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, नाजेर कुरेशी , बालासाहेब ढेरे , एन. खरात , शिवाजी डोळझाके , खलेक कुरेशी , रामेश्वर ढेरे, अंबादास वढे, विवेक ढोके, महेश भालेकर , ज्ञानराज भालेकर, राजवीर भालेकर , रामभाऊ भालेकर आदी मंडळीकडून सत्कार करण्यात आला.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→14 फेब्रुवारी 2022
गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी निमित्त व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन,                        हरी कीर्तनासाठी उपस्थित राहण्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले यांचे आवहान

गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी निमित्त व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन, हरी कीर्तनासाठी उपस्थित राहण्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले यांचे आवहान

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात