📰 ताज्या घडामोडी

सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता अतिक्रमण ग्रस्त मोकळा करण्यात आला.

च
Shamsundar chittoda
1 फेब्रुवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर तालुक्यातील सावरगाव (बुद्रुक) येथील सावरगाव बुद्रुक ते कुंभार पिंपळगाव कडे जाणारा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अतिक्रमण ग्रस्त होता तो तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने मोकळा करण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमण असलेला रस्ता, शेतकऱ्यांचे व पिंपळगाव कडे जाणाऱ्या लोकांचे झालेले हाल या कारवाईमुळे संपुष्टात आले. गेल्या दोन वर्षापासून शेतामध्ये तयार झालेला माल व शेतीमध्ये नेण्यासाठी लागणारे खत अक्षरशः दुसऱ्या गावाहून शेतीमध्ये नवे लागत होते. शेतकऱ्यांना व मुक्या जनावरांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. या यातनेचा अंत पाहून सुमारे 40 शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार परतूर यांना निवेदन देऊन या वही वाटा प्रमाणे जाणारा अतिक्रमित रस्ता मोकळ्या करण्याची विनंती केली. तसेच माजी मंत्री व विद्यमान आमदार माननीय बबनराव जी लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री मंत्री युवा नेते माननीय राहुल भैया लोणीकर यांना वेतना व होणारे हाल शेतक-याने यांच्या निदर्शनास म्हणून दिले. माननीय बबनराव जी लोणीकर साहेबांनी व राहुल भैया लोणीकर साहेबांनी माननीय तहसीलदार साहेबांना फोन करून या व्यथा सांगितल्या तात्काळ तहसीलदार मॅडमनी अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. याकामी आष्टी महसूल मंडळ अधिकारी श्रीपाद मोताळे साहेब तसेच किशोर वावरे तलाठी सज्जा पिंपळी धामणगाव व आष्टी पोलिस स्टेशनचे पीआय माननीय नागवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार जे.डी. सुक्रे साहेब, एस .एस. काकडे साहेब, महिला कॉन्स्टेबल एस.एल कांदे मॅडम यांच्या उपस्थित

मोलाची कामगिरी बजावून अर्धा किलोमीटर असलेला अतिक्रमित रस्ता रात्री तीन वाजेपर्यंत काम करून मोकळा करून दिला. गावकऱ्यांच्या वतीने या कारवाईबद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी एक प्रकारचा श्वास मोकळा करण्यात आला. सर्व महसूल प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→31 जानेवारी 2022
परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया

परतुर मतदारसंघातील क्रिडा चळवळ जागृत ठेवण्यात कायमखानी सरांचा मोलाचा वाटा - मा.आ.सुरेशकुमार जेथलिया

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात