📰 ताज्या घडामोडी

मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

च
Shamsundar chittoda
10 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

मंठा(सुभाष वायळ )

दि.06 मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून सामाजिक उपक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.स्वामी समर्थ ब्लड सेंटर जालना व आयोजक सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे मित्र मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले होते. मानवी रक्त कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. मानवी रक्तास अजून पर्यंत पृथ्वीतलावर काही पर्याय नाही. रक्त तयार होते फक्त निरोगी मानवी शरीरात आपल्या संस्कृतीमध्ये दानास खूप महत्त्व आहे. गोदान, अन्नदान,भूदान या दानामुळे जीव जगू शकतो. परंतु रक्तदानामुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने रक्तदान करावे. अपघाताने धोक्यात सापडता प्राण, रक्त मिळताच मिळे जीवदान,ठेवूनिया सामाजिक जाण, पुण्यकर्म करावे करुनी रक्तदान या उक्तीप्रमाणे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक जाणिवेतून मंठा परिसरातील नागरिकांनी रक्तदानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 30 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे, मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर चे कर्मचारी अधिकारी यांनी श्रम घेतले.यावेळी आयोजक सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे व श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे अधिकारी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 फेब्रुवारी 2022
शर्मा क्रिकेट ॲकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीनच्या  जालना जिह्वा संघात

शर्मा क्रिकेट ॲकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीनच्या जालना जिह्वा संघात

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात