📰 ताज्या घडामोडी

अंगावर शहारे आणणारा ‘पावनखिंड’ चा ट्रेलर रिलीज…

च
Shamsundar chittoda
10 फेब्रुवारी 2022•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडल्या जात आहेत. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दिग्दर्शक लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेल ! हर हर महादेव’

या चित्रपटात पावखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना अक्षरशः अंगावर काटा येतो. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 फेब्रुवारी 2022
ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री यांच्या सत्कार व ग्रंथा चे वाटप

ह. ब. प. सतीश महाराज शास्त्री यांच्या सत्कार व ग्रंथा चे वाटप

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात