📰 ताज्या घडामोडी

उस्वद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Shamsundar chittoda
3 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा-(सुभाष वायाळ)

दि.03 मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शेतमजूर युनियनचे जिल्हासचिव कॉम्रेड सचिन थोरात, राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड स्वाती थोरात यांची उपस्थिती होती..ज्या काळात महिलांना शिक्षण घेणे अशक्य होते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी कर्मठांकडून होणारा शेण, दगड, चिखल यांचा मारा सहन करून मुलींना शिक्षण देण्याचे असाध्य कार्य यशस्वी केले. त्यांनी त्यांच्या कवीतांच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कुटुंबाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रियांनी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे त्या ठासून सांगत. महिलांचे होणारे शोषण वेगवेगळ्या क्षेत्रात अत्याचार सहन न करता रणरागिणी सारखे आधुनिक कल्पना चावला ,सुनिता विल्यम्स, मीरा बोरवणकर, यांच्या सारखे कर्तृत्व सिद्ध करुन शिक्षण, आरोग्य ,उद्योग ,प्रशासकीय क्षेत्रात नाव उंचावून आई वडिलांचे नाव रोशन करुन समाजात आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन शेतमजूर युनियन लालबावटाचे जिल्हा सचिव काँ सचिन थोरात यांनी केले. त्यासोबत आजच्या या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी भुमिहीन, शेतमजूर महिलांचे जमीन, घर,रोजगार, पेन्शन आदी प्रश्न सोडवून त्यांच्या जीवनात सुख आणण्यासाठी सतत प्रयत्न करणार असे कॉ सचिन थोरात यांनी सांगितले .यावेळी युनियनच्या राज्य कमिटी सदस्य काँ स्वाती थोरात यांनी बोलताना सांगितले की,समाजातील नागरिकांनी आपल्या घरांतील महिलांना जसे की आई,, पत्नी, मुलगी यांना सर्वच क्षेत्रात पुढे आणुन महिला सक्षमीकरण द्रुढ करावे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणावे असे सांगितले .यावेळी शेतमजूर युनियन गाव कमिटी सदस्य संतोष कांबळे, विकास कांबळे, बाळु कांबळे ,लता अंभोरे ,चंद्रकला नवघरे,भगवान अंभोरे, आत्माराम कांबळे आदी सह शेकडो शेतमजूर उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात