📰 ताज्या घडामोडी

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची-. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर. दर्पण दिनानिमित्त भाजपा, माऊली अर्बन पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा गौरव

Shamsundar chittoda
8 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे. स्वतंत्रपूर्व काळात दर्पणकार बाळशास्त्री बाळकृष्ण जांभेकर यांनी तात्कालीन इंग्रज राजवटीला आपल्या लेखणीतून सळो की पळो करून सोडले होते. समाज प्रबोधन करून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सरकारला झुकवण्याची पत्रकारिता जांभेकेरान सोबतच स्वातंत्रपूर्व लढ्यातील पत्रकारांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे.असे प्रतिपादन माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले.ते भारतीय जनता पार्टी व माऊली अर्पण पतसंसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

(ता.7) शुक्रवार रोजी माऊली इग्लिश स्कूल येथील आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, आयोजक,भाजपा तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सतीशराव निर्वळ,बाजार समितीचे संचालक निवासराव देशमुख,प्रसाद बोराडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेशराव कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव बोराडे, बाबूजी तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आ.लोणीकर बोलताना पुढे म्हणाले की, माझा राजकीय कारकीर्दीत अनेक पत्रकारांनी मला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून बातमीतून देखील सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचा कधी आकस न करता त्यांच्या सूचनांना प्राधान्य देऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. समाजातील चांगल्या-वाईट दोन्ही बाजूचे समर्थपणे मानण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. असे बोलून सर्व पत्रकारांचा शाल, हार व दिनदर्शिका देऊ सत्कार करण्यात आला.या वेळी बाबूजी तिवारी,बाबासाहेब कुलकर्णी,संतोष दायमा,प्रदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी पत्रकार राजेश भुतेकर,रवी पाटील,कृष्णा भावसार,आरून राठोड,तुकाराम मुळे,डॉ.आशीष तिवारी,केशव येऊल,अनिल खंदारे,रणजित बोराडे, रघुसिंग जनकवार,

सो.मंजुषा काळे,आसाराम शेळके,अतुल खरात,हाफिज शबाब बागवान,मानसिंह बोराडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य बोलताना माऊली अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष सतीशराव निर्वल म्हणले की, मंठा तालुक्यातील पत्रकार हे सातत्याने माऊली अर्बन पतसंस्था,माऊली इंग्लिश स्कूल तसेच माझ्या सर्व सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे मला सातत्याने नवनवीन उपक्रम घेण्याची इच्छाशक्ती मिळत राहते असे बोलून सर्व उपस्थित पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली अर्बन पतसंस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमोल कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री बोराडे यांनी मानले.

---------------------------------------------------------

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात