📰 ताज्या घडामोडी

सामान्य जनतेच्या कामास विलंब करून मनमानी कारभार करणार्‍या तहसिलदारांची बदली करा -- अच्युत पाईकराव

Shamsundar chittoda
5 जानेवारी 2022⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

सामान्य जनतेचे तहसील कार्यालयातून वेळेवर कामे होत नसून कामास विलंब करून मनमानी करणार्‍या तहसिलदार यांची तात्काळ बदली करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा उपाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यामध्ये सामान्य नागरिक आपल्या राशन कार्ड, संजय गांधी योजना, शेती प्रकरणे, पी.एम.किसान योजना, निवडणुकीच्या मतदार नाव नोंदणीसह, तालुक्यातील बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करून जनतेला वेठीस धरत असल्याने माहिती घेणे देणे यासह आदि समस्या संदर्भात चकरा मारीत असून अनेकांच्या समस्या सुटत नाहीत. तहसिलदार या कार्यालयात नियमित तसेच वेळेवर येत नसल्याने कर्मचारी वर्ग मनमानी करीत असल्याने सामान्य जनता वेठीस धरून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे विविध कामे खोळंबली आहेत. तहसिलदार या सामान्य जनतेचे कामे करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच महसूल कर्मचारी यांच्यावर वचक नसल्याने यांची येथून तात्काळ बदली करून निलंबन करावे. तसेच पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील नागरिकांना घरकुल मिळाले आहेत. त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभर्थ्यांचे स्थळ पाहणी करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना असताना गटविकास अधिकारी पंचायत समिती हे दुर्लक्ष करीत आहेत. तात्काळ स्थळ पाहणी प्रक्रिया सुरू करावी. नसता दि. १९ जानेवारी २०२२ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, अच्युत पाईकराव, सोमेश्वर गायकवाड, भाऊराव आखाडे, दीपक मुंढे, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात