📰 ताज्या घडामोडी

रायपूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..======

च
Shamsundar chittoda
6 जानेवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

हनुमंत दवंडे

परतुर: दिनांक 5 जानेवारी 2022रोजी हनुमान मंदिर रायपूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर शिवाजीराव तरवटे साहेब यांनी आपले विचार मांडले तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन अशोक राव आघाव साहेब यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर प्रवीण काका सातोनकर साहेब यांनी आपले मत मांडले या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक रावजी आघावसाहेब नगर परिषद परतूर चे नगरसेवक प्रवीण काका सातोनकर रासपचे शिवाजीराव तरवटे साहेब आणि पत्रकार मित्र दवंडे साहेब, खांडवी येथील प्रथम नागरिक तथा सरपंच गणेश रावजी हरकळ साहेब, खांडवी येथील उत्तमराव वाघमारे रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच तसेच ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुकडे सर यांनी केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 जानेवारी 2022
सामान्य जनतेच्या कामास विलंब करून मनमानी कारभार करणार्‍या तहसिलदारांची बदली करा -- अच्युत पाईकराव

सामान्य जनतेच्या कामास विलंब करून मनमानी कारभार करणार्‍या तहसिलदारांची बदली करा -- अच्युत पाईकराव

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात