📰 ताज्या घडामोडी

पत्रकार राहुल मुजमुले यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.....

च
Shamsundar chittoda
10 जानेवारी 2022•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर –(हनूमंत दंवडे)

परतूर येथील पत्रकार राहुल शामराव मूजमुले यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाला परतूर येथे आयोजित दर्पण दिननिमित्त कार्यक्रमात मराठी पत्रकार संघ परतूर पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

परतूर तालुक्यात राहुल मुजमुले यांनी २०१६ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना मराठी पत्रकार संघ परतूर शाखेच्या वतीने श्री.मूजमुले उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या निवडीबद्दल पत्रकार संघटना, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान,दर्पण दीना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री.मुजमुले याना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी. आ.बबनराव लोणीकर, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मुख्याधकारी सुधीर गवळी,सभापती कपिल आकात,प्रभारी अध्यक्ष सादेक खतीब,मा.न.अध्यक्ष विनायकराव काळे,विजयनाना राखे,मोहन अग्रवाल,सुधाकर बापू सातोनकर,शत्रूघ्न कणसे, संतोष चव्हाण,मधुकर झरेकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष शामसूंदर चितोडा, सचिव सुरेश कवडे,योगेश बरीदे, कैलाश सोंळके,रशिद बागवान,सय्यद वाजेद,संजय देशमाने,शेख अथर,कैलास चव्हाण,मुमताज अंसारी,शेख तारेक, इम्रान कुरेशि,सय्यद जूनेद,एकनाथ राऊत,आदींनी अभिनंदन केले.

..................

फोटोओळी-- परतूर तालूका युवा पत्रकार पुरस्कार राहुल मुजमुले याना मिळाला यावेळी त्याचा सत्कार करतांना आ.बबनराव लोणीकर, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मुख्यअधिकारी सुधीर गवळी,मोहन अग्रवाल,सुधाकर सातोनकर,सादेक खतीब,सिदार्थ बंड,योगेश बरीदे,मुन्ना चितोडा आदी दिसत आहे.

पूर्ण...

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→10 जानेवारी 2022
विडोळी येथे नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळा संपन्न

विडोळी येथे नाट्य अभिनय दिग्दर्शन कार्यशाळा संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात