📰 ताज्या घडामोडी

परतूर थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा वॉच

Shamsundar chittoda
1 जानेवारी 2022⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (हनुमंत दवंडे) नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात.

परतूर शहरात 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’

नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला जातो. यात काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात. हे प्रकार रोखण्यासाठी परतूर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील मुख्य चौक तसेच अंतर्गत भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ राहणार आहे.

कोरोना तसेच ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहने दामटण्याचे प्रकार हाेतात. त्यासाठी शहरात ठिकिठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. संशयित वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. .

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात