मंठा -(सुभाष वायाळ) दि.4 मंठा तालुक्यामध्ये रेती व गौण खनिजे उत्खनन हे अवैधरित्या चालूच आहे. रेती व गौण खनिजे प्रतिबंधक पथकाची कारवाई मात्र शून्य आहे. अवैध गौण खनिज व रेती यासाठी तहसीलच्याच अधिकारी व कर्मचारी यांचा हात असतो हे कालच्या दिनांक 3 रोजीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. मंठा येथे मुरमाचे टिपर व ट्रॅक्टर चालू ठेवण्यासाठी मंठा तहसील मधील कर्मचारी विठ्ठल पांडुरंग बोरकर वय 34 वर्ष ह.मु.संत तुकाराम नगर मंठा यांनी एकूण 26 हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे संपर्क साधून मंठा तहसील येथे सापळा रचला व तहसील मधील कर्मचारी यांना सव्वीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध दि.04.01.2022 रोजी गु.रं.न.4/2022 कलम 7व 7अ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षक एस.एस.ताटे करीत आहेत.
मंठा तहसीलचा कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात
💬 आपले मत नोंदवा
या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
वाचा (Read Story)→आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा
सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.
इतर ताज्या बातम्या
सर्व बातम्या पहा ↗
ताज्या बातम्यापावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*
शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*
स्थानिक (जालना / परतूर)विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;
चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
स्थानिक (जालना / परतूर)दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात
सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल