📰 ताज्या घडामोडी

लोणी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गूळ युनिट चे उद्घाटन

Shamsundar chittoda
26 जानेवारी 2022⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

आष्टी व कोकाटे हादगाव सर्कल मधील शेतकरी प्रचंड प्रमाणात ऊस लावत असतात, या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुचंबणा होऊ नये या उद्देशाने लोणी खुर्द येथे सुरू होत असलेले हे गुळ युनिट शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

ते लोणी खुर्द तालुका परतुर येथे प्रथमेश ऍग्रो इंडस्ट्रीच्या गुळ युनिट चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते

पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय सुरू करणे ही काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्यपालन त्याचबरोबर शेतमालावर आधारित छोटे-मोठे प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज असून या भागातील तरुणांनी या कामात पुढाकार घेतल्यास निश्चितपणे आर्थिक क्रांती घडून येणार असल्याचे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले

पुढे बोलताना ते म्हणाले की, या भागांमध्ये जलयुक्त शिवार च्या माध्यमातून जलक्रांती झाली असून या ठिकाणच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे त्यामुळे या भागांमध्ये शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल ऊस लागवड करीत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले पैठण धरणाचा डावा कालवा व पाण्याचे इतर स्त्रोत उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळबागा व पाण्याखालील क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे याचा फायदा घेत या भागात व्यापार-उदीम उद्योगधंद्यांना उभे करण्याची जबाबदारी युवकांवर असून त्यासाठी आपण सदैव पाठपुरावा करण्यास तयार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले

या भागातून शेगाव पंढरपूर सारखा राष्ट्रीय महामार्ग आपण खेचून आणत दळणवळणाची उत्तम माध्यम उपलब्ध करून दिले असून वाड्या-वस्त्यांवर पोहोचण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना आवागमन करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झालेली आहे मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या विजेचा विचार करून आपण मंत्री असताना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अनुक्रमे कोकाटे हदगाव व कऱ्हाळा येथे 33 केव्ही वीज उपकेंद्राची उभारणी करून कमी दाबाने होणाऱ्या विद्युत पुरवठा हा प्रश्न निकाली काढला आहे त्या मुळे या भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केले असल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले

======================

*आष्टी क्लस्टरचा राष्ट्रीय रुरबन योजने अंतर्गत विकास*

=====================

डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेच्या माध्यमातून 325 कोटी रुपयाच्या आराखडा मधून मोठा विकास झाला असून या भागासाठी प्रस्तावित असलेली मिनी एमआयडीसी कार्यान्वित करणे व शेतकरी समूहांच्या मालकीच्या शेती उत्पादित मालावर आधारित प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या स्थापन करून सुरू करणे ही आपली महत्वकांक्षा असून या माध्यमातून शेतकऱ्यांचा मोठा विकास होईल यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे या वेळी आमदार लोणीकर यांनी नमूद केले

विकास हा आपला स्थायीभाव असून आपण राज्याचे मंत्री असताना जिल्ह्यासह मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला मतदार संघात विकास कामे करत असताना मतदारसंघाचा समतोल विकास करण्यावर भर देत गोदे पासून पूर्णे पर्यंत डांबरीकरणाच्या रस्त्याचे जाळे निर्माण केले सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सिमेंट नाला बांध नदी खोलीकरण रुंदीकरण या माध्यमातून मोठे काम या मतदारसंघात उभे केले मतदारसंघातील नेर शेवली चा भाग असो युवा मंठा तालुक्यातील तळणी जयपुर चा परिसर असो या सर्व भागांमध्ये विकास कामे करून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले

या वेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्यासह प्रथमेश ॲग्रो इंडस्ट्रीज चे संचालक दिनेश देशमुख राघवेंद्र देशमुख तसेच बाबाराजे देशमुख जिजा यादव सुदाम प्रधान विक्रम तौर पंजाबराव बोराडे बंकट नाना सोळंके रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात माणिकराव वाघमारे सुरेश सोळंके गजानन लोणीकर बाळासाहेब यादव सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात