📰 ताज्या घडामोडी

वाढोना येथे लोकसहभागातून शेतीपोच रस्त्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले या उपक्रमाचे कौतुक

Shamsundar chittoda
29 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

वाटूर(प्रतिनिधी) दि 29 डिसेंबर 2021 रोजी युवामोर्चा प्रदेश महामंत्री तसेच जि प मा उपाध्यक्ष जालना मा राहुल लोणीकर यांनी वाढोना येथे लोकसहभागातून तयार झालेल्या रस्त्यांची पाहणी केली व पुलाचे उद्घाटन केले. जालना जिल्ह्यात गाव पातळीवर असा नवखा उपक्रम राबविणारे वाढोना हे पहिलेच गाव ठरले आहे . लोकवर्गणीतून शेता पर्यंत रस्ते तयार करण्याचा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून मा. राहुल भैय्या लोणीकर यांनी आनंद व समाधान व्यक्त करून शेतकऱ्यांचे अभिनंदन केले . वाढोना येथे पहिल्यांदाच लोकवर्गणीतून 3 km चे चार शेतीपोच रस्ते तयार करण्यात आलेले आहेत अश्या प्रकारचा उपक्रम संपूर्ण जालना जिल्ह्यात राबविला जावा, शेतकरी व गावकऱ्यांनी या उपक्रमातुन प्रेरणा घ्यावी यासाठी या उपक्रमास प्रसिद्धी मिळावी म्हणून मा. कलेक्टर साहेब व कर्तव्यदक्ष मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी वाढोना येथे प्रत्यक्ष भेट द्यावी व असा उपक्रम जिल्ह्यात इतर ठिकाणी राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत मा. राहुल लोणिकर यांनी व्यक्त केले तसेच पुलाचा निधी स्वखर्चातून देण्याचे आश्वासन दिले . जिल्ह्यात इतर ठिकाणी असा स्तुत्य उपक्रम राबविल्यास होईल तेवढी मदत करु असे राहुल लोणिकर यांनी सांगितले व प्रत्येक शेतकऱ्यांने यातून धडा घेऊन असे प्रेरणादायी उपक्रम राबवावेत अशी इच्छा व्यक्त केली . या स्तुत्य पूर्ण उपक्रमास माजी सभापती रामेश्वर तनपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले सदर उद्घाटन प्रसंगी माजी सभापती मा. रामेश्वर

तनपुरे ,शेतकरी नावनाथराव तनपुरे, गुलफराज शेख ,कैलास शेळके,सुरेश शेळके,बाळू तनपुरे, बाळासाहेब तनपुरे, विश्वम्बर तनपुरे, आत्माराम तनपुरे, संतोष तनपुरे, विकास शेळके,भानुदास चाळक,ज्ञानेश्वर तनपुरे, अनिल तनपुरे, शंकरराव शेळके,भारत शेळके,गजानन शेळके,बापूराव शेळके सोनू तनपुरे, आदिनाथ तनपुरे ,गणेश शेळके व गावकरी हे सर्व उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात