📰 ताज्या घडामोडी

ई श्रम कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार विविध सरकारी योजनेचा लाभ-अविनाश राठोड

Shamsundar chittoda
15 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

सरकारला "ई श्रम कार्ड" द्वारे ओबीसी चा डाटाबेस तयार करता येईल., तो डाटाबेस सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्नच आरक्षण टिकू शकेल... अविनाश राठोड

मंठा(सूभाष वायाळ)

तालूक्यातील नायगाव ग्रामपंचायत आणि केंद्र सरकार च्या कॉमन सर्विस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने "ई श्रम कार्ड" काढण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.हे उपक्रम पुढील तीन दिवस चालणार असून या शिबिराच्या माद्यमातून कॉमन सर्विस सेंटर चे ऑपरेटर एकनाथ जाधव, आकाश आढे आणि आकाश राठोड यांनी 16 ते 59 वयातील अनेक नागरिकांचे "ई श्रम" कार्ड काढून तें पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे.नागरिकांना या माद्यमातून 12 अंकी UAN नंबर मिळणार असून या मुळे गरीब लोकांचा डेटा बेस सरकार कडे जामा होणार आहें.या योजनेच्या माध्यमातून शेतकरी,घरेलू नैकर ,आशा वर्कर, वाहनचालक इतर कामगारांना विविध सरकारी योजनेचा लाभ होणार असल्याचे अविनाश राठोड यांनी सांगितले. त्या मध्ये प्रधानमंत्री श्रम मानधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, इतर योजनेचा लाभ होणार आहे. पुढे त्यांनी ज्या नागरिकांनी श्रम कार्ड काढलेले आहे त्या व्यक्तीची दुर्घटना झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाख रुपयाचा दुर्घटना विमा दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे 60 वय झाल्यास लाभार्थ्याला तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. दुर्घटनेमध्ये अपंगत्व आल्यास एक लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळणार असून हे कार्ड संपूर्ण देशात चालणार असल्याचे राठोड यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाला सरपंच गजानन फुपाटे ग्रामसेवक बाबासाहेब गवळी रघुनाथ कोकाटे. इतर गावकरी उपस्थित होते.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात