📰 ताज्या घडामोडी

मंठा पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर

Shamsundar chittoda
14 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

दि. 14 मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून मंठा या ठिकाणी राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे. या दवाखान्या वर शहरातील व बरेच शे खेडेगावातील जनावरे, पशुपक्षी वैद्यकीय उपचारासाठी अवलंबून आहेत. राज्य शासनाने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी इमारत बांधली आहे.परंतु या दवाखान्यामध्ये व आजूबाजूचा परिसरात घाणीचे साम्राज्य आहे व हा परिसर पूर्णपणे अस्वच्छ आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसून येतो. शेतकऱ्यांना शेतीतील काम धंदा सोडून जनावरांना या दवाखान्यामध्ये घेऊन यावे लागतात. तसेच जवळपासच्या खेड्यांमधून सुद्धा या दवाखाना मध्ये जनावरे घेऊन येतात. परंतु त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी उपस्थित नसतात.या दवाखाना मध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाहीत तसेच तेथील अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असतात. शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खाजगी वैद्यकीय उपचार करावा लागतो. व नाहक भुर्दंड भरावा लागतो. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा परिणाम पशुपालन करणारे यांच्यावर झाल्याचा दिसून येतो. मंठा परिसरामध्ये बरेचसे पशुपालक पशुपक्ष्यांचे व जनावरांचे लसीकरण सुद्धा खाजगी मध्ये करून घेतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर वेळीच लक्ष द्यावे. व शेतकऱ्यांची यातून सुटका करावी. तालुक्यातील शेतकरी व पशु पक्षी पालक राज्य सरकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्या बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात