📰 ताज्या घडामोडी

शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याची मंठा जिनिंग मालकाकडून दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची लूट

Shamsundar chittoda
13 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा (सुभाष वायाळ)

मंठा तालुक्यामध्ये चार खाजगी कापूस खरेदी जिनिंग आहेत. या सर्व जिनिंग मध्ये शेतकऱ्यांनी काबाडकष्ट व अहोरात्र मेहनत करून पिकवलेले शेतकर्‍याचं पांढर सोन म्हणजेच अर्थात कापूस हा कवडीमोल किमतीमध्ये खरेदी केला जात आहे. या खाजगी कापूस खरेदी जिनिंग मालकांची परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एवढी मोठी दहशत निर्माण झाली आहे की त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासही कोणीही पुढे येईना.याची कारणेही अनेक आहेत यामध्ये शेतकऱ्याचा अडाणीपणा म्हणा किंवा नाहक त्रास महणा परत आणखी एक कारण आहे की शेतकऱ्याचा कापूस खरेदी केल्यानंतर नगदी रक्कम घ्यायची असेल तर शेकडा दोन ते तीन रुपये कमी दिले जातात. व चेकद्वारे रक्कम घ्यायची असेल तर पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु याही गोष्टीला सामान्य शेतकऱ्यासाठी तीन ते चार महिने लागतात. मंठा तालुक्यातील जिनिंग मधील कापसाचे दर आणि शेजारील तालुक्यातील कापसाचे दररोजचे दर पाहिले असता कापसाचे 1 नंबर, 2 नंबर,3 नंबर अनुक्रमे 800 रुपये, 500 रुपये, 300 एवढा मोठा फरक भावा मध्ये दिसून येत आहे. व एवढ्या मोठ्या कमी फरकाने मंठा खासगी जिनिंग मालकाकडून कापूस खरेदी केला जात आहे. उदाहरणार्थ परतूर व सेलू येथील कापसाचा भाव आठ हजार सहाशे रुपये असेल तर मंठा जिनिंग मध्ये आठ हजार रुपये किंवा आठ हजार शंभर रुपये असतो. मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी असे समजायचेका की, मंठा तालुक्यातील कापूस हा निकृष्ट दर्जेचा आहे. असे असले तरी हाच कापुस शेजारील तालुक्यामध्ये नेला तर चांगला भाव मिळतो. अशाप्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक व अडवणूक केली जात आहे. तरी संबंधित विभागाने यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी व शेतकर्‍यांना योग्य न्याय द्यावा. अशा रीतीने शेतकऱ्याची दिवसाढवळ्या लूट केली जात आहे. ही लूट थांबवावी.अशी शेतकऱ्याची दबक्या आवाजा मध्ये चर्चा आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात