📰 ताज्या घडामोडी

संपत टकले यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील ७० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया साठी प्रयन्त

Shamsundar chittoda
9 डिसेंबर 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी)ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या विविध आजारावरून होणारी फरफट,स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या शहरात उपचार करवून घेतांना सहन करावा लागणारा आर्थिक भार आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील लोक डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांच्या आजाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेकांना अकाली अंधत्वाच्या सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांनी पुढाकार घेत श्रीष्टी सर्कल मधील ७० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. बुधवारी सकाळी यातील ३० रुग्णांची पहिली फेरी शस्त्रक्रियेसाठी जालना येथे पाठविण्यात आली. यावेळी सेवा निवृत्त मंडळ अधिकारी भानुदासराव टकले यांच्या हस्ते रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. शिवाजी पोकळे, मावचे सरपंच अरविंद सवने, मदन बोराडे, परमेश्वर सवने, नामदेव सवने, रणजित सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्थानिक परिसरातील शेतकरी, शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.आगामी काळात देखील अनेक सामाजिक उवक्रम राबविण्याचा आपला मानस असल्याचे मत यावेळी संपत टकले यांनी व्यक्त केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात