📰 ताज्या घडामोडी

परतूरात महावितरचा कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित करून भाजपा युवामोर्चाचे ठिय्या ,आंदोलन बबनराव लोणीकर यांच्या भ्रमणध्वनी नंतर श्रीष्टी सर्कलसह परतूर तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत

Shamsundar chittoda
10 डिसेंबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर(प्रतीनीधी)

थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी सरसकट शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा पवित्रा महावितरणने घेतल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता परतूर शहरातील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित करून सहायक अभियंत्याच्या दालनात तब्बल २ दोन ठिय्या देत जोरदार घोषणा घोषणाबाजी केली. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा युवामोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे कडक पवित्रा घेता आक्रमक आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरु केला जात नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला होता.ठिय्या आंदोलन मध्ये सहभागी यावेळी भाजपा तालुका रमेश भापकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे युवामोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले,रमेश आढाव,नितीन जोगदंड, शिवाजी पाईकराव,वसंत बेरगुडे, रयत क्रांतीचे गजानन राजबिंडे,संभाजी खवल, धोंडीराम नवल, राजेश ढवळे, संभाजी शिंदे,सदाशिव खवल,शिव संग्रमचे सचिन खरात,सूर्यभान कदम विष्णु मचाले, शुभम कठोरे, कैलास खालापुरे,करण गोरे,किसनराव आघाव, सुरेश भूंबर, पांडुरंग बरकुले, आसाराम नवल आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीला महावितरण कार्यालयासमोर ठिय्या दिलेल्या आंदोलकांनी काही वेळाने अक्रमक पवित्रा घेत उपकार्यकारी अभियंत्यांचे दालन गाठले. दालनाचा ताबा घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी कार्यालयातील विद्युत पुरवठा बंद करून आतील ट्यूबलाईट,पंखे काढून घेतल्या गेले. आंदोल आक्रमक झाल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले.

*वीजबिलासाठी महावितरण शेतकऱ्यांना कुठल्याही नोटीसा न देता मनमानीपणे वीजपुरवठा बंद करते. हीच तत्परता एखादा ट्रान्सफार्मर बंद बदल्यावर का दाखवत नाही. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे दरवर्षी शोर्ट सर्किट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून मोठे आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागते. यापुढे शोर्टसर्किट मुळे ऊस जळाला तर संबंधित शेतकऱ्याला महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी केली*.

रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतांना, महावितरणची ही हुकुमशाही शेतकरी सहन करून घेणार नाही. मंत्र्यांच्या मतदार संघात कमी पैसे भरून घेत वीज पुरवठा सुरु केला, मग आमच्यावर हा अन्याय का ? असा सवाल उपस्थित करत कणसे यांनी महावितरण अभियंत्यांना धारेवर धरले.

लोणीकरांची मध्यस्थी : माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांनी भ्रमणध्वनीवरून उपकार्यकारी अभियंता एन.व्ही.बेंडाळे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा अधिकार महावितरणला नाही. महावितरणने अशी अडेल भूमिका घेतली तर जशास तसे उत्तर देऊ असे सांगत वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत आदेशित केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात