📰 ताज्या घडामोडी

माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

च
Shamsundar chittoda
28 डिसेंबर 2021•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

प्रतिनधी(आष्टी)

आई-वडिलांच्या सेवेत सर्व सुख सामावलेले असून,आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा प्रत्येक मुलगा ईश्वराच्या जवळ आहे असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले

ते लोणी खु ता परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व. दत्तात्रय (नाना) लोणीकर यांच्या चौदाव्याचा कार्यक्रमा प्रसंगी हरिकर्तनात बोलत होते

*आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।*

*कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।*

*गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।*

*तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥*

या अभांगचे निरूपण करताना त्यांनी अनेक दाखले देत मातृ पित्र सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून युवा पिढीने हे व्रत अंगिकारने गरजे असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले

पुढे हभप बंडातात्या कराडकर म्हणाले की, बदलत चाललेली समाजव्यवस्था ही, विघातक असून या व्यवस्थे मुळे आई वडील पती पत्नी या नात्याना तिलांजली दिली असून या मुळे सांस्कृति विनाशाच्या उंबरठ्यावर आपण असून हे थांबवन्यासाठी सांस्कृति चे जतन करणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले

=======================

*आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*

*माजी मंत्री बबनराव लोणीकर*

=======================

उपस्थितांचे आभार मानताना माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आई वडिलांनी केलेल्या संस्कारा मुळे आपण राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करू शकलो असे सांगतानाच माझे वडील धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांनी संपूर्ण आयुष्य पंढरपूर ची वारी न चुकता केली अनेक प्रसिद्ध कीर्तनकाराच्या किर्तना मध्ये आपल्या अभंगाच्या माध्यमातूंन सेवा केली असे भावूक उदगार या वेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले..!!

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→28 डिसेंबर 2021
मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे

मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात