📰 ताज्या घडामोडी

दैठणा बु व हरेरामनगर येथील शालेय व्यवस्थापन समित्या ची परंपरा कायम दोन्ही समित्या बिनविरोध

Shamsundar chittoda
31 डिसेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर(हनूमंत दंवडे)

तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये राजकारण केल्या जात असुन शिक्षण क्षेत्रातही कुरघोडी भांडणांचा बाजार मांडला आहे.पण याला दैठणा बु व हरेराम नगर अपवाद ठरला आहे.तालुक्यात दैठणा गावाची परंपरा आहे शालेय व्यवस्थापन समितीची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.

यात अध्यक्ष म्हणून श्री विठ्ठल नरवडे तर उपाध्यक्ष म्हणून श्री अशोक मुकादम यांची निर्विरोध निवड झाली.

तसेच पालक सदस्य म्हणून सौ मीरा तात्याराव गायके, द्रोपदा गुलाबराव कवडे, श्री कैलास मखमले, सौ शोभा गजानन वखरे, सौ गंगासागर अर्जुन सोनगुडे, श्री हनुमान थोरे, श्री लक्ष्मण मोरे, सौ नीता विठ्ठल घोडे यांची तर, शिक्षण प्रेमी म्हणून श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून सौ संगीता शामराव चव्हाण यांचे नामनिर्देशन करण्यात आले. सदर निवडीवेळी खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध सर्व निवड पार पडली. याप्रसंगी सरपंच मा.श्री. शत्रुघ्न भैय्या कणसे यांनी नवीन समितीस शुभेच्छा देताना शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी समितीस सहकार्य करण्यासाठी मी सदैव असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक श्री एम वी काळे यांनी कामकाज पाहिले.

जिल्हा परिषद प्राथ.शाळा हरेरामनगर येथे शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. नियोजनाप्रमाणे पालक सभेस उपस्थित पालकांमधून बिनविरोध सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाली. यावेळी सरपंच शत्रुघ्न कणसे वसंतराव बेरगुडे शामराव चव्हाण आसाराम रेपे अशोक बेरगुडे परमेश्वर रेपे पुंजाराम कणसे आसाराम उनवणे गुलाब कवडे, श्रीराम मोरे आदी उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात निवडप्रक्रिया पार पडली.

प्रशाला हरे राम नगर येथील

नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यांची नावे खालील प्रमाणे...

1) श्री ज्ञानेश्वर पंडितराव सोलंके (अध्यक्ष)

2) श्री सुशील लिम्बाजी कणसे(उपाध्यक्ष)

3)श्रीम.लता विठ्ठल कणसे (सदस्य)

4)श्रीम.अर्चना ज्ञानदेव कणसे(सदस्य)

5)श्रीम.मुक्ता निवृत्ती कणसे (सदस्य)

6)श्री विठ्ठल अण्णासाहेब घोड़े(सदस्य)

7)श्री भरत श्रीराम कणसे(सदस्य)

8)श्री ज्ञानेश्वर प्रल्हादराव कणसे (शिक्षणतज्ञ)

9)श्री गौतम काळूबा भदरगे( ग्रा.सदस्य)

सर्व नवनियुक्तांचा शाळेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेत श्री शत्रुघ्न सदाशिवराव कणसे (सरपंच), श्री आसारामजी नवल उद्धव कणसे, ज्ञानेश्वर कणसे गोविंद सोळंके काळुबा भदर्गे भरत कणसे किसन मखमले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मुख्याध्यापक श्री पवार एम. पी. (मु.अ.)श्रीमती अंभुरे एस. के.(स. शि.)व पालक उपस्थित होते.

शाळा हे ज्ञान मंदिर आहे त्याचे पावित्र्य राखले पाहिजे जि.प शाळा ही जीवन घडवणारे ठिकाण आहे त्यामध्ये वादविवाद व राजकारण करून शाळेचा खराब करू नका शाळेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार

*शत्रुघ्न कणसे पाटील*

जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद जालना

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात