📰 ताज्या घडामोडी

कायद्यावर लाकूड तोड गिरण्यांची करवत.................

Shamsundar chittoda
31 डिसेंबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर (हमूमंत दवंडे)

परतुर शहरातील आरा गिरण्याच्या तपासनित वन विभागाचा हलगर्जीपणा वाढताच अवैध लाकूड वाहतूक बोकाळली आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत ट्रक-ट्रॅक्टरद्वारे लाकडाची वाहतूक सुरू आहे. वृक्षतोड व लाकूड वाह तुकीचा परवाना नसतानाही गिरणीसमोर वाहनांच्या रांगा आहेत. फिरते पथक दिसून येत नाही.

वन विभागाची कारवाई ढेपाळली आहे. महसूल व पोलिस प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यातीलअवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने स्वतंत्रनियमावली तयार केली पाहिजे. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असावी दरमहा प्रत्येक आरा गिरणीचे रजिस्टर तपासून वृक्षतोडीसाठी परवानगी असल्याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. वृक्षतोड परवानगी ते वाहतूक परवानगीसाठी अधिकारी नियुक्त कोण आहेत मात्र, प्रत्यक्षात दिसत नाहीत.

परतुर तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढली आहे. दिवसा कारवाईची शक्यता असल्यामुळे लाकूड माफियांनी दररोज रात्री लाकडांची वाहतूक सुरू केली आहे. रात्री १० ते सकाळी सात या वेळेत शेकडो वाहनांद्वारे शहरात लाकूड आणले जाते. विशेषतः आष्टी रोड वाटू र सातोना,माव पाटोदा या भागातून मोठ्या प्रमाणात लाकूड वाहतूक आष्टी रोडवर बघायला मिळते

रेल्वे स्टेशन रोड परतुर ,परतुर गाव परिसरातील गिरण्यात (सॉ मिल्स) सर्वाधिक वाहनांची ये-जा सुरू असते. ट्रॅक्टर किंवा ट्रकमध्ये ताडपत्रीखाली झाकून लाकूड आरा गिरणीत विक्रीसाठी आणतात. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून वन अधिकाऱ्यांनी सर्रास डोळेझाक केली आहे. बाभूळ, निंब बांबू या प्रजातीचे झाड तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. पण, आंबा, कडूनिंब, पिंपळ, साग, चंदन अशा महत्त्वाच्या झाडांसाठी परवानगी आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या मालकीचे बांधावरील झाड तोडण्यासाठी तहसीलदार किंवा समकक्ष महसूल अधिकारी परवानगी देतात. वनक्षेत्रातील झाड तोडण्यासाठी वन अधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. मात्र, नियमाचे सर्रास उल्लंघन करून वृक्षतोड जोरात सुरू आहे. वाहतुकीचा परवाना नसताना शेकडो वाहनातून लाकडांची वाहतूक होते. शहर परिसरातील नाक्यावर संबंधित वाहनांची तपासणी बंधनकारक आहे. पण, वन विभागाचे फिरते पथक क्वचितच वाहनांची तपासणी करताना दिसत नाही. वठलेले झाड तोडण्यास परवानगी आहे. सध्या ओले लाकूड मोठ्या प्रमाणात शहरात आले आहे. या माध्यमातून दररोज लाखो रूपयांची उलाढाल असली तरी शासकीय महसूल बुडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

फिरते पथक गायब

अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाचे स्वतंत्र फिरते पथक असावे. या पथकाची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी

यांच्याकडे असते. योग्य कारवाई वन विभागाने करावी. फिरत्या पथकाचे काम कागदावर उरले आहे.

दाट झाडीच्या परिसरातून सागवान आणतात. हा प्रकार म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. आरा गिरणीत खरेदी केलेल्या लाकडाची नोंद असते. झाडाची जागा, झाडाची प्रजात, शासकीय अधिकाऱ्याची परवानगी, वाहतूक परवाना यांची नोंद करणे बंधनकारक आहे. वन अधिकारी नोंद तपासत नसल्यामुळे गिरण्यात नोंद नसते. त्यामुळे लाकडू कुठून आणले याचा उलगडा होत नाही.

, विविध भागातून लाकडे भरूनआलेल्या वाहनांची नाक्यावर तपासणी होणे गरचे आहे .

पण या कडे वनविभागाने कानाडोळा केलेला दिसतो. लाकडांचनी भरून वाहने रोडवर आपणाला दिसतात. यावर प्रत्येक्ष वन विभाग अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

पण, रात्री अवैध वाहतूक होते. ती रोखण्याची जबाबदारी महसूल, पोलिस आणि वन विभागाची आहे. फळझाडांसह १३ प्रजातींची झाडे असल्यास वन विभाग कारवाई करतो. कडूलिंब व इतर लाकूड असल्यास महसूल प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.

‘लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे अनेकदा दिसते. मात्र, लाकूड माफियांना याबाबत जाब विचारणे जोखमीचे ठरते. वन विभागाने कडक कारवाई केल्यास वृक्षतोडीला आळा बसेल. परवानगी मिळवून क्वचितच वृक्षतोड होत असावी. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले पाहिजेत.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात