📰 ताज्या घडामोडी

मंठा तालुक्यातील नायगाव येथे कायद्याविषयी शिबिरास गावकर्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

Shamsundar chittoda
15 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)दि.15 तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत मध्ये आजादी का अमृत महोत्सव 75 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई च्या कायद्या विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीर ची सुरवात मंठा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय.श्री. ए.के.शर्मा साहेब,शासकीय वकील मुस्ताक शेख ॲड.संतोष देशमुख, ॲड.राजेश खरात, ॲड.ए. ए.कुलकर्णी,ॲड अजय वायाळ, ॲड.सोहेल पठाण,सरपंच गजानन फुपाटे, अविनाश राठोड, इतरांनी पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालक दिनानिमित्त न्यायाधीश साहेबांनी लहान मुलाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

न्यायाधीश साहेबांनी आपल्या भाषणामध्ये कायदा हा गरिबासाठी किंवा श्रीमंत साठी वेगळा नसतो.. तो सर्वांसाठी समान असतो,भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार मधील कलम 14 नुसार सर्वांना समान कायदा आहे, कलम पंधरा नुसार जातीचा भेदभाव करता येणार नाही, कलम 16 नुसार सर्वांना समान शासकीय नोकरीची संधी आहे, कलम 19 नुसार स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, कलम 25 नुसार विविधते मध्ये एकता आहे, त्याचप्रमाणे सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी तडजोडीने गावातील वाद मिटवता येतील, पुन्हा त्यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई विषयी माहिती दिली.,

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये उपसरपंच अविनाश राठोड नायगावचा लोखंजोखा मांडला. कार्यक्रम पार पाडण्यात, पोलीस पाटील नारायण फुपाटे,ग्रामसेवक बी एस गवळी, मुख्याध्यापक एस व्ही.जायभाय आणि नंदकिशोर साबू, शिक्षक व्ही एस.दुभळकर आणि एस. बी.घुगे, ग्रामसेवक राहुल सूर्यवंशी, इतर उपस्थित होते.

या शिबिराचे आयोजन ॲड,संतोष देशमुख, सरपंच गजानन फुपाटे, उपसरपंच अविनाश राठोड यांनी केले होते.,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक.एस. व्ही.जायभाय यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. संतोष देशमुख यांनी केले.

चौकट --

कोरोणा मध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे माननीय श्री.न्यायाधीश ए.के.शर्मा साहेबांनी सरपंच गजानन फुपाटे आणि उपसरपंच अविनाश राठोड यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात