📰 ताज्या घडामोडी

गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवीला होणार धर्म परिषद गोरधर्म व गोरबोली मान्यतेसाठी समाजाने एकत्र यावे - जगदीश राठोड,संचालक नेत्रा ग्रुप

Shamsundar chittoda
18 नोव्हेंबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

मंठा(सुभाष वायाळ)

गोर बंजारा धर्मपीठ,पोहरागड येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२१ रोजी धर्म परिषद व संस्कृतीक सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या परिषदेसाठी जालना जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अहवाल नेत्रा ग्रुपचे संचालक जगदीश राठोड यांनी केले आहे. यासाठी तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथील गोरबंजारा धर्मपीठ संत सेवालाल महाराज पुण्यभूमि पोहरादेवी येथे देशभरातून हजारो साधुसंत, महंत,भक्तगण व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,धर्मपीठ तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य गोरधर्म परिषद भरणार आहे.यावेळी गोर धर्म पीठाधीश्वर परमपूज्य बाबुसिंग महाराज,गोपाल चैतन्य बाबाजी, सिद्धलिंग स्वामी,प्रेमसिंग महाराज,बळीराम महाराज, दुर्गादास महाराज,कबीरदास महाराज,जुगनू महाराज,भोजू महाराज,गोपाल महाराज,धनु महाराज, हरिशरणानंद महाराज, विशुद्धानंद महाराज,मथुरा.लक्ष्मण महाराज,आथनी.पंकजपाल महाराज,दादाराव महाराज,यशवंत महाराज,परशुराम महाराज,सुनील महाराज,जनार्दन महाराज,सेना महाराज, अंबरसिंग महाराज,योगानंद बापु,दहिफळ खंदारे. सह अनेक धर्मगुरूचा समाजाला आशीर्वाद व मार्गदर्शन मिळणार आहे.यावेळी बंजारा धर्म व सांस्कृतिक परिषद होणार असून देशभरातील बंजारा प्रतिनिधी,साधू- संत,साहित्यिक,कवी,भजनी,गीतकार,प्रबोधनकार यांची उपस्थिती राहणार आहे. गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी सर्व धर्मसंस्था प्रमुखाची उपस्थिती राहणार असून,सर्व मंदिर,संस्थान प्रमुख व साधुसंत यांच्या उपस्थितीत मध्ये धर्मसत्ता माध्यमातून बंजारा समाजाचा विकास या विषयावर चिंतन व मंथन होणार आहे. संपूर्ण बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज व पांढरा झेंडा ही समाजाच्या अग्रभागी आसणार असून यावेळी साधुसंताच्या हस्ते गोरधर्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल धर्मपरिषदेतुन धर्मसत्ता- राजसत्ता-साहित्यसत्ता यावर चर्चा आसुन समाज विकासासाठी शिक्षण महत्वाचे हा संदेश दिला जाणार आहे. १० कोटी बंजारा समाजाला दिशा देण्याचे काम धर्म सत्तेच्या माध्यमातून केला जाईल व बंजारा गोरबोलीला व आपल्या स्वतंत्र चालीरीती, रुढी परंपरा असणाऱ्या गोरधर्माला मान्यता मिळवणे हा मुख्य अजेंडा या धर्म परिषदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे.यामुळे भविष्यामध्ये गोरधर्म व गोरबोली साठी संपूर्ण समाज धर्मसत्तेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल व आपल्या न्याय हक्कासाठी समाजाला एकत्र आणण्यासाठी धर्मपरिषद महत्त्वाची भूमिका बजावेल.देशांमध्ये पहिल्यांदा धर्मपरिषद होत असून या धर्मापरिषदेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमांतर्गत विविध जबाबदाऱ्या स्वयसेवेसाठी,तसेच कार्यक्रम सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बांधवांनी. विचारवंत नेते, कार्यकर्ते, मार्गदर्शक, सल्लागार यांनी संपर्क साधावा असे अवाहन गोर धर्म पीठावरून करण्यात आले आहे. याचबरोबर सदरील परीषदेसाठी जालना परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे,अवाहन नेत्रा ग्रुपचे संचालक-जगदीश राठोड यांनी केले आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात