📰 ताज्या घडामोडी

शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा - मोहन अग्रवाल

Shamsundar chittoda
30 ऑक्टोबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी): आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम,सुदर्शन सोळंके, भगवानराव सुरुंग, विदुर जईद, दत्ता सुरुंग, अहेमद चाऊस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आगामी पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील नेते,पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख अशोकराव आघाव, शहर प्रमुख विदुर जईद, दत्ता सुरुंग, युवासेनेचे अजय कदम, महिला आघाडीच्या कुंतीका भुसारे, युवसेना शहर प्रमुख सोनू भोकरे, राहुल कदम, दलित आघाडीचे मधुकर पाईकराव आदींनी केले आहे. चौकट - दरम्यान यावेळी मोहन अग्रवाल यांनी परतूर शहराच्या विकास कामाबाबत माहिती देतांना म्हटले पक्षाचा प्रमुख नेता व पालिकेत गटनेत्याची भूमिका बजावताना मी परतूर शहराच्या विकासासाठी माजी राज्य मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली, या पाठपुराव्यायाला यश मिळवत यातील पहिले 3 कोटीं रुपये मंजूर झाला असल्याची माहिती देत नाविन्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध विकास कामांना प्रशासकीय

मान्यता मिळाली असल्याची त्यांनी माहिती दिली येत्या काही दिवसात या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे सांगत उर्वरित 2 कोटी मंजुरीच्या टप्यात असल्याचे ते म्हणाले, याबरोबर खा संजय जाधव व विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी शहराच्या विकासासाठी 1 कोटींचा निधी दिला आहे असे एकूण 6 कोटी शहराच्या विकासासाठी मिळाले असल्याचे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी यापुढेही निधी उपलब्ध करणार असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात