📰 ताज्या घडामोडी

रायपुर रेल्वे गेटजवळील पुलाची दुरुस्ती करा; नसता रेल रोको आंदोलन करणार-रमेश भापकर

Shamsundar chittoda
11 ऑक्टोबर 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतुर(प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाकडुन रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 या रेल्वे गेटवर भूमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे. या दरम्यान सदरील पुलाचे काम बोगसरित्या करण्यात आले असुन यावेळी पूलाच्या आजु-बाजुने पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित पर्यायी नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने या पुलाच्या खाली ५ फुटांपर्यंत पाणी जमा होत आहे.रायपुरसह इतर गावांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज सकाळी माजीमंत्री बबनराव लोणीकर,युवामोर्चा महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने परतुर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी रेल्वे प्रबंधकाला निवेदन सादर केले.त्यात सदरील पुलाची आठ दिवसात पुलाची दुरुस्ती करावी नसता भाजपच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी संपत टकले,शत्रुघ्न कणसे,अशोक बरकुले,शिवाजी पाईकराव,विष्णु बरकुले,उध्दव बरडे,डॉ.रविंद्र बरकुले,दत्तराव रायकर,प्रभाकर जाधव,तुकाराम मांटे,अशोक अंभोरे,उध्दव शेरे,सतिश सस्ते,पंडित आवटे,राजेभाऊ जगदाळे,गणेश हरकळ,हनुमान वाघमारे,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परतुर तालुक्यातील रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 जवळ रेल्वे गेटजवळ भुमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे.या पुलाच्याखाली पावसाळयाचे पाणी जमा होऊन

रायपुर,सिरसगाव,खांडवी, खांडवीवाडी, पिंप्रुळा रंगोपंत टाकळी व शेलगाव या अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. येथुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पुलाच्या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरुण प्रवास करावा लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रूग्णांना व महिलांना या पाण्यातुन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असुन रेल्वे प्रशासनाने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करावी. सदरील ठिकाणीचे पाणी हे दुषित झाले असुन रायपुर गावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने नागरीकांच्या जीवाशी न खेळता कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून आठ दिवसात या पुलाची दुरुस्ती करून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. नसता भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी दिला आहे.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात