📰 ताज्या घडामोडी

पुरस्कप्रश्नांच्या सोडवणुकी सोबतच शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक गरजेचे ,परतूर येथील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांचे प्रतिपादन

Shamsundar chittoda
11 ऑक्टोबर 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर : शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक जरूर व्हावी, या सोबत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जावा. अधिक चांगले काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता यावे यासाठी हा पुरस्कार असून खरे काम करणाऱ्या शिक्षकांचा हा प्रातिनिधिक स्वरूपातील सन्मान असल्याचे मत जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांनी मत केले. आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या परतूर शाखेच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजन शहरातील मराठा क्रांती भवन येथे रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुखदेव चव्हाण, बाल शिक्षण तज्ञ नूतन मघाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, प्रा.पांडुरंग नवल, गटसमन्वयक कल्याण बागल, बाबासाहेब भापकर, विष्णू वाघमारे, अरुण भांडवलकर, कैलास उफाड, सुरेश तोटे, सोमनाथ उदेवाळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्या बरोबर कुटुंबांचे आरोग्य संरक्षण असो इतर कुठलेही शासकीय काम, आमच्या शिक्षक बांधवानी काटेकोरपने पार पाडले. ही सर्व कामे करत असतांना, आपली शाळा आणि विद्यार्थी यांच्याशी असलेली नाळ शिक्षकांनी तुटू दिली नाही. शिक्षकांच्या या मेहनतीमुळेच जिल्हापरिषदेच्या शाळेतील मुले विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकली आहेत. अशा सर्व शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा कायम आमचा प्रयत्न असेल असे पुढे बोलतांना डॉ.काकडे म्हणाले.

ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यावर काम करणाऱ्या महिला शिक्षिका आणि त्यांचे प्रश्न यावर काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरु असून यापुढे ही अविरतपणे सुरु राहील, असल्याचे मत नूतन मघाडे यांनी व्यक्त केले.

गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, प्रा.पांडुरंग नवल, विनायक भिसे, महादेव काळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

ग्रामीण भागातील वाढोणा येथील जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेतील तीन विद्यार्थ्यांना नवोदयसाठी पात्र करण्यास परिश्रम घेणारे तसेच वृक्ष लागवडी साठी पुढाकार घेणारे प्राथमिक शिक्षक विनायक भिसे आणि धनराज मल्लाडे, विष्णू शिंदे यांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. याशिवाय अश्विनी मोरे, वर्षा इज्जपवार, स्वप्ना गोडबोले, स्मिता गायकवाड, रुपाली कुलकर्णी, महादेव काळे,संदीप वाकळे, उमाकांत ठाकरे, रंगनाथ लहाने, अन्सारी नेहाल अहमद गुलाम, लक्ष्मण विचारे, विजयकुमार बोरुळे, नागनाथ गंगुलवार,बाबासाहेब गायकवाड, मंताजी ढाकरे, शेख निहाल अहमद सुभान, शाम वराढ, संतोष मुपडे, उद्धव माहळकर, ओंकार इंगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास उफाड यांनी तर आभार विष्णू वाघमारे यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याससाठी तालुकाध्यक्ष बाबासाहेब भापकर, सुरेश तोटे, सोमनाथ उदेवाळ.राजेश लोखंडे, तुकाराम आकात, राहुल सरकटे, गौतम गणकवार, सोपान वडेकर, विनोद सातोनकर आदींनी परिश्रम घेतले.

फोटो-पुरस्कार स्वीकारताना शिक्षक महादेव काळे दिसत आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात