📰 ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणावर चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने, आमच्या हक्काचे वस्तीगृह सुरू करावे,जालना जिल्ह्यात वस्तीगृहाच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक,*माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात 151 गावांमध्ये आंदोलन

Shamsundar chittoda
9 जून 2021⏱️ ३ मिनिटे वाचन
WhatsApp

तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण राज्यातील आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही राज्यातील सरकार मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करत आहे यासंदर्भात सरकारच्या या कृतीवर मराठा समाज प्रचंड संतापलेला असून राज्यभरात 58 मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणासाठी प्राणांच्या आहुती द्याव्या लागल्या होत्या

या सगळ्या बाबींचा विचार करून सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडायला हवी होती मात्र तसे सरकारने केले नाही त्याचबरोबर राज्यात फडणवीस सरकार असताना मराठा समाजातील मुलांसाठी राज्यभरामध्ये जिल्हा स्तरावर वस्तीगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये वस्तीगृह सुरू झालं होतं तर काही वस्तीगृहा ची कामे अंतिम टप्प्यात होती मात्र निवडणुका लागल्या आणि दुर्दैवाने सत्तांतर झाले बदललेल्या सत्ताधीशांनी मराठा मुलांच्या वस्तीगृहांचा प्रश्न अनुत्तरित ठेवला यावर कळस म्हणून जालना येथे तर पालकमंत्री राजेश टोपे यांनी या नियोजित वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये घुसखोरी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बसवण्याचा प्रयत्न केला

तात्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हे वस्तीगृह प्रस्तावित केले होते सदरील वसतिगृहाचे काम पूर्ण झालेले होते अशा परिस्थितीमध्ये ठाकरे सरकारने निर्णय घेऊन जालना जिल्ह्यासह राज्यातील सर्व वस्तीगृह मराठा मुलांसाठी खुली करावयास हवी होती मात्र तसे न झाल्याने जिल्ह्यातील भाजपा व मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून यामुळे जिल्ह्यातील परतूर मंठा जालना घनसांगी तालुक्यातील 151 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात येऊन राज्यातील मराठा समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करावेत त्याचबरोबर जालना येथील वस्तीगृहातील घुसखोरी थांबून मराठा समाजाला न्याय द्यावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे परतुर येथील कार्यालय परतूर येथे ठेवावे या मागण्यांसाठी दिवसभर तीव्र निदर्शने करण्यात आली

=======================

*जिल्हाभरात भाजपाचा आक्रमक पवित्रा*

=======================

महत्प्रयासाने मिळवलेले आरक्षण टिकवू न शकलेल्या तिघाडी सरकार चा धिक्कार करत गावागावांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रश्नावरून दिवसभर आंदोलन करण्यात आले इतिहासात प्रथमच सरकारचा निषेध करण्यासाठी गावागावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तात्कालीन फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्व जिल्ह्यातील मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थित शासकीय विश्रामगृहामध्ये मध्ये वस्तीग्रह साठी जागा उपलब्ध करून दिली होती या वस्तीगृहातील सर्व कामे पूर्ण झाली होती रंगरंगोटी करून सज्ज असलेल्या इमारतीमध्ये पालकमंत्री राजेश टोपे यांनी घुसखोरी करून परतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय घुसवण्याचा डाव टाकला हा डाव हाणून पाडण्यासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून आज त्याचा प्रत्यय आला गावागावांमध्ये कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला या आंदोलना मध्ये सहभागी होत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात आंदोलन केले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात