📰 ताज्या घडामोडी

मराठा आरक्षणासाठी मराठ्यांसह बहुजन समाजाने 5 जूनच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात सामील व्हावे*सचिन खरात

Shamsundar chittoda
3 जून 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

*परतुर(प्रतीनीधी)गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मा. आमदार विनायकराव मेटे संघर्ष करीत असून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजबांधवांची जनभावना आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध निर्णय आल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून आ. विनायकरावजी मेटे यांच्यानेतृत्वाखाली बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा दि.5 जून रोजी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जनभावना असणाऱ्या बहुजन समाजाने देखील या मोर्च्यात सहभागी होऊन मराठा समाजाला साथ द्यावी असे आवाहन सचिन खरात यांनी केले आहे.

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये सर्व प्रथम आरक्षणाची तरतूद करुन मागासलेल्या जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. आज देशाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू असताना मराठा समाजाची दैनिय अवस्था झालीय. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाची स्थिती मराठ्यांवर ओढावली आहे. मराठ्यांवरील मागासलेपण दूर करून त्यांना ही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची मराठा समाजाला आज गरज असून आरक्षणासाठी मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अशी जनभावना तमाम बहुजन समाजात आहे.

मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने आज पुन्हा रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ मराठा समाजावर आलीय.आ.विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनला बीड मध्ये मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. हा केवळ मोर्चा नसून आरक्षणाच्या लढ्यासाठी मोर्चा आहे. ही बघण्याची वेळ नसून मोर्च्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याची वेळ असल्याचे म्हणाले. तसेच मागास जातींना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आज मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी बहुजन समाजाने मराठयांना साथ देऊन आरक्षणाच्या मोर्च्यात सहभागी होवून पाठींबा द्यावा, असे आवाहन ही सचिन खरात यांनी केले आहे

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात