📰 ताज्या घडामोडी

पीक कर्जासाठी ऑनलाइन ऐवजी गाव स्तरावरच ऑफलाइन पद्धत राबवा, भाजपा युवा मोर्चाची मागणी

Shamsundar chittoda
19 मे 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतीनीधी)

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जाचे अर्ज गाव स्तरावर तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परतूर तालुका भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे.

माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून तसेच युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात सगळीकडे संचार बंदी लागू आहे. ग्रामीण भागात ऑनलाइनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अर्ज ऑनलाइन करण्यासाठी शेतकाऱ्यांकडून १०० रुपये एवढे शुल्क खाजगी दुकानदारांकडून आकारले जाते. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच वेळी अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. वरील सर्व अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जासाठी प्रत्येक गाव स्तरावर नियुक्त तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या कडे पीक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारण्याची व्यवस्था करावी, जेणे करून शेतकऱ्यांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. गावामध्ये कागदपत्रांची जुळवा जुळव करणे सोपे जाईल.

गावस्तरावर जमा झालेले अर्ज प्राधान्यक्रमानुसार बँकेत जमा करावे, बँकांनी त्यांच्या कडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करून एका एका शेतकऱ्याला बँकेत बोलवावे. बँकेत होणारी गर्दी या मुळे कमी होण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्याधिकारी आणि अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी ऑनलाईन अर्जांची पद्धत बंद करून ऑफलाईन पद्धतीने गाव स्तरावर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे नगरसेवक प्रकाश चव्हाण,कृष्णा अरगडे सरपंच केशव ढवळे,बंडू भुंबर,विकास सवणे,सिद्धेश्वर बोरकर,केशव आघाव, प्रकाश सवणे, संजय अवचार, हनुमंत चिखले,गणेश कणसे आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळी : परतूर येथील एसबीआयचे शाखा व्यवस्थापक रवींद्र डोंगरे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देतांना युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजपा ता.उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे, नगरसेवक कृष्णा आरगडे, केशव ढवळे, बंडू भूंबर.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात