📰 ताज्या घडामोडी

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून परतूर, मंठा, नेर ग्रामीण रुग्णालयांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी,आय सी यू व्यवस्थेसह सिटीस्कॅन व्हेंटिलेटर बेड एक्स-रे मशीन आदी सुविधा होणार उपलब्ध,*परतूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना हॉस्पिटलच्या अठरा ऑक्सीजन खाटांचे उद्घाटन,3054 व 25/15 चा आमदारांना देण्यात येणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा वाढवण्यासाठी सरकारने खर्च करावा

Shamsundar chittoda
12 मे 2021⏱️ ४ मिनिटे वाचन
WhatsApp

परतूर (प्रतिनिधी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने राज्याचे माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दीड कोटी रुपये निधी जाहीर केला असून या निधीमधून परतूर मंठा व नेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन मशिन ,व्हेंटिलेटर बेड, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले

ते परतूर येथे ग्रामीण रुग्णालयातील 18 ऑक्सिजन बेडचे कोरोना हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

पुढे बोलताना ते म्हणाले की कोरोना रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे करिता सर्वप्रथम आपण आपल्या आमदार फंडाचा निधी या कामासाठी खर्च करीत असल्याचे सांगितले कोरोना चा वाढता प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये वाढती लोकसंख्या ही गोष्ट लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्ह्यातील तालुका स्तरावर कोविड हॉस्पिटल नसल्यामुळे रुग्णांना थेट जालन्याला जावे लागते त्यामुळे जिल्ह्यावरील रुग्णालयात बेड भेटणे कठीण होते बेड अभावी अनेकांना प्राण गमवावे लागतात आपण याची गंभीर दखल घेत यासंदर्भात सततचा पाठपुरावा करत या ठिकाणी ग्रामीण रुग्णांसाठी व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आधारवड फाउंडेशन ने या कामामध्ये पुढाकार घेत पाच लक्ष रुपये मदत केली असून त्यांच्या कामाचे कौतुक यावेळी आमदार लोणीकर यांनी केले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की

पुढे बोलताना ते म्हणाले की अरोग्य सुविधा वाढवण्या साठी दर वर्षी 2 कोटी रुपये निधी खर्च करण्याची परवानगी सरकार ने द्यावी जेणे करून उत्तम आरोग्य सुविधा जनतेला उपलब्ध होतील असेही ते म्हणाले

======================

*3054 व 25/15 चा आमदारांना देण्यात येणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा वाढवण्यासाठी सरकाने खर्च करावा*

=======================

राज्य सरकारने 3054 व 25/ 15 या हेड खाली आमदारांना दिला जाणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करावा असे सांगतानाच सरकार मधील आमदारांची प्रत्येकी 5 कोटी व विरोधी पक्षातील आमदारांना प्रत्येकी 1 कोटी निधी विकास कामावर खर्च न करता ग्रामीण रुग्णालयात कोविड संदर्भातील अद्यावत सुविधा साठी खर्च करण्याची मागणी या वेळी आमदार लोणीकर यांनी केली

=======================

*विकास कामे करायला खूप कालावधी आहे मात्र हाच निधी जनतेचे प्राण वाचवण्यासाठी खर्च करण्याची गरज*

=======================

मंत्री ,आमदार यांना विकास कामासाठी पुष्कळ वेळ आहे मात्र आज कोरोनाच्या या भयानक संकटात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने योग्य भूमिका घेत वैद्यकीय सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे राज्यातील सर्व आमदारांचा फंड यासह विकास कामासाठी दिला जाणारा वेगवेगळ्या प्रकारचा निधी या कामासाठी वापरण्याची गरज असून आपण आपला संपूर्ण फंड या कामासाठी देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले

=======================

*जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा केला सत्कार*

=======================

कोविड हॉस्पिटल चे उद्घाटन प्रसंगी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालय परतूर येथील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

=======================

*केंद्राने दिलेल्या लसी वरच महाराष्ट्र क्रमांक एक वर*

======================

केंद्राने दिलेल्या लसी वरच महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर असून विनाकारण काही लोक आपली पाठ थोपटून घेत असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक लस पुरवठा केंद्राने केल्यामुळेच आज राज्य क्रमांक एक वर असल्याचे ते म्हणाले

*पंतप्रधान सहाय्यता निधी सी एस आर फंड, डी पी सी चा निधी जिल्हा रुग्णालया साठीच न वापरता ग्रामीण रुग्णालयावर खर्च करून ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात*

,====================

केंद्र सरकारचा पंतप्रधान सहाय्यता निधी सीएसआर फंड त्याचबरोबर डीपीसी चा निधी जिल्हा आरोग्य केंद्रावरच खर्च करण्यात आला मात्र हा निधी ग्रामीण भागातील तालुका स्तरावर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी खर्च करण्याची गरज असून यामुळे ग्रामीण भागामध्ये होणारा कोरोना चा प्रसार रोखण्यास मदत होईल व जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले या संदर्भामध्ये आपण वेळोवेळी पत्रव्यवहार करून ग्रामीण रुग्णालयावर निधी खर्च करण्यात यावा अशी मागणी केली होती असेही ते म्हणाले

======================

*परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण सतत प्रयत्नशील*

=======================

आपण मंत्री असताना परतूर येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते हे प्रयत्न करत असताना तीन वेळा तात्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या दालनामध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या उपजिल्हा रुग्णालय याचा परिपूर्ण प्रस्ताव असतानाही तो त्यावेळी आरोग्य मंत्र्यांच्या उदासीनतेमुळे निकाली निघाला नाही मात्र यासाठी आपण आताही प्रयत्न करत असून या संदर्भामध्ये आरोग्य संचालक आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून परतूर येथे उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता देण्या ची मागणी केली असल्याचेही ते म्हणाले

यावेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपा चित्रक विलासराव आकात बद्रीनारायण ढवळे अशोकराव बुरकुले नगरसेवक संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे प्रवीण सातोनकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष छत्रगुन कणसे लक्ष्मणराव टेकाळे रमेश राव केव्हा रे सुरेश राव सोळंके यांच्यासह कार्यकर्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानदेव नवल डॉक्टर काळे डॉक्टर अंभोरे यांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात