📰 ताज्या घडामोडी

परतूर येथे संजीवनी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने घेतला पुढाकार

Shamsundar chittoda
29 एप्रिल 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रदीप सातोनकर व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे संजीवनी डी सि एच सी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुधाकरराव सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर, डॉक्टर गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी आर नवल, युवा मोर्चा सरचिटणीस संपत टकले ,भाजयुमो तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे नगरसेवक प्रकाशराव चव्हाण, नगरसेवक कृष्णा आरगडे ,नगरसेवक जगन बागल ,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवी सोळंके राजेंद्र मुंदडा माऊली सोळंके, श्याम सुंदर चितोडा, प्रशांत बोनगे ,किशोर कद्रे यांच्यासह संचालक प्रवीण सातोनकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की राज्यभरामध्ये कोरोना ची भयावह स्थिती असून अशा स्थितीमध्ये शहरातील सर्वच रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या आहेत

यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत मात्र ग्रामीण भागातील रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने पुढाकार घेत परतूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने बऱ्याच रुग्णांना फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले

पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर व प्रवीण सातोनकर यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आपण व्यक्त केली होती या पार्श्वभूमीवर हे कोविड सेंटर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले असल्याचे सांगतानाच राहुल लोणीकर म्हणाले की , विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत जी पाटील यांच्या सूचनेवरून परतूर येथील कोविड सेंटर जनतेच्या सेवेत रुजू होत असल्याचेही ते म्हणाले

पुढे ते म्हणाले की ग्रामीण भागातील रुग्णांनी या रुग्णालयाचा उपयोग करून असेही ते म्हणाले

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात