📰 ताज्या घडामोडी

स्व.किशोर अग्रवाल यांना पत्रकारांची श्रध्दांजलीशहरातील चौकात पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार-विकासकुमार बागडी

Shamsundar chittoda
13 फेब्रुवारी 2021⏱️ १ मिनिटे वाचन
WhatsApp

जालना,दि.13 (प्रतिनिधी) रुपम ग्रुपचे चेअरमन, ज्येष्ठ समाजसेवक स्व. किशोर अग्रवाल यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम न्यूज पेपर्सच्या जालना जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील हॉटेल मधुबन येथे झालेल्या शोक सभेत भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान, यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी म्हणाले की, स्व. किशोर अग्रवाल यांची समाजसेवा खर्‍याअर्थाने वाखण्याजोगी होती. गरिबांना मदत करणे हा त्यांचा छंद होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळातही त्यांनी भरघोस अशी मदत केलेली आहे. त्यांची ही सेवा विसरण्याजोगी नाही. त्यांच्या पासून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांची प्रतिमा शहरातील एखाद्या चौकात उभारुन त्या चौकाला स्व. किशोरसेठ अग्रवाल असे नाव देण्यात यावे, अशी आपण संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांसह सर्व संबंधितांकडे करणार असून तशा आशयाचे निवेदनही उद्या सोमवारी देणार असल्याचे यावेळी संंघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकासकुमार बागडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लियाकतअली खान यांनी केले. तर शोकसभेस रवि अग्रवाल, राम अग्रवाल यांच्यासह नरेश धारपवळे, मुकेश परमार, विजय जाधव, सिताराम तुपे, ईर्शाद शेख, दिनेश नंद, नदीम कुरेशी, अशपाक पटेल, सुनिल खरात, राहुल वाहुळे, संतोष भुतेकर, सोनाजी झेंडे, इलियास शेख अब्बास, दिपक शेळके, शहानवाज कुरेशी, मयूर अग्रवाल, मधुकर मुळे, धंनंजय देशमुख, रुख्मीणिकांत दिक्षीत आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात