📰 ताज्या घडामोडी

सर्वांनी मिळून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे भाजपाच्या वतीने समर्पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

Shamsundar chittoda
11 फेब्रुवारी 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

जनसंघाच्या निर्मितीपासून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व सर्व सामान्य व्यक्तीच्या सहकार्यातून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे मत भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे आयोजित समोर पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, ज्ञानेश्वर शेजुळ, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे पंचायत समिती उपसभापती नागेश घारे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे विठ्ठलराव काळे नाथराव काकडे उद्धवराव गोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या माध्यमातून जनसंघ का पासून भारतीय जनता पार्टीचे सुरुवात झाली असून ०२ खासदारांच्या संख्या पासून ते आज ३०३ खासदारांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचली आहे भारतीय जनता पार्टी आज जगातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची कार्यपद्धती ध्येय धोरणे विचारधारा या सर्व बाबींचा विचार आपणास करावा लागेल पंडित जी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समर्पणाची शिकवण दिली त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी संपूर्ण देशभरात समर्पण दिन म्हणून साजरी केली जाते असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने आजपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण केला आहे यापुढे देखील कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पार्टी काम करणार आहे त्यामुळेच इतर पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीला जनाधार अधिक आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना समर्पण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह अंकुशराव कदम संजय गायकवाड नरसिंग राठोड गणेशराव शहाणे मुस्तफा पठाण प्रकाश मुळे डॉ. शरद पालवे विकास पालवे प्रसादराव गडदे प्रसाद बोराडे सखाराम दादा बोराडे अंसाबाई राठोड जयश्री पवार राजेभाऊ खराबे सोपानराव वायाळ गणेशराव खैरे शिवाजीराव ढवळे अरुण खराबे राजेभाऊ नरवडे प्रमोद बोराडे दिलीप जोशी कोमल कुचेरिया भागवत डोंगरे समाधान वाघमारे प्रमोद भालेकर गजानन शिंदे गोविंद केंधळे अशोक डोके त्र्यंबक हजारे सुरेश राठोड बाबासाहेब सरकटे कांतराव जाधव नारायणराव बागल सुभाषराव बागल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात