📰 ताज्या घडामोडी

आष्टी येथील रूरबन अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन,सरकारच्या उदासीनतेमुळे अनेक प्रकल्पांची कामे रखडली-माजी मंत्री बबनराव लोणीकर

Shamsundar chittoda
8 फेब्रुवारी 2021⏱️ २ मिनिटे वाचन
WhatsApp

केंद्र सरकार ची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजना ही महाराष्ट्र राज्यातील केवळ सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली या योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील आष्टी व परिसरातील सोळा गावांचा समावेश करण्यात आला या माध्यमातून आष्टी व परिसरातील गाव समूहांचा मोठ्या प्रमाणात विकास साधला गेल्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते आष्टी येथे आष्टी शहरांतर्गत रस्ते व आष्टी शहरातील अंतर्गत पाईपलाईन च्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की रूरबन योजनेच्या माध्यमातून आष्टी शहरासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आपण मंत्री असताना मंजूर करून घेतला आज आष्टी गावातील 4 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आपणास आनंद असून गेल्या कित्येक महिन्यांपासून निधीअभावी रखडलेली 3 कोटी रुपयांची अंतर्गत पाईपलाईन अंथरन्याची योजना आपण प्रयत्न पूर्वक मार्गी लावली असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

======================

*सरकारच्या उदासीनते मुळे मिनी एम आय डी सी प्रकल्प रखडला*

=======================

सरकारच्या दुर्लक्षामुळे आष्टी सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण प्रयत्नपूर्वक मंजूर करून आणलेला शेतकऱ्यांसाठी चा मिनी एमआयडीसी प्रकल्प रखडला असल्याची टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी गटांनी फळप्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेत कंपन्याचे रजिस्ट्रेशन केले होते मात्र सद्यस्थितीमध्ये पालकमंत्री व सरकारच्या दुर्लक्षामुळे सदरील प्रकल्प रखडला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 27 च्या वर कंपन्या फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार होत्या मात्र शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता या प्रकल्पाकडे मुद्दाम हून डोळेझाक करत हा प्रकल्प रखडत ठेवण्यात आल्याची टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली

पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की मतदार संघाच्या विकासासाठी 6 हजार 700 कोटी रुपयांचा निधी आणला या निधी मधून मतदार संघात अनेक विकास कामे झाली आष्टी सारख्या गावामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण खेचून आणला त्यामुळे आष्टी शहरातील बस स्थानक असेल सिमेंट रस्ते असतील पाईप लाईन असेल वीज वितरण कंपनीचे कामे असतील इत्यादी कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,मदनलाल सिंगी,रमेश भापकर, रामप्रसाद थोरात, रंगनाथ येवले, खंडेराव पाटिल, बाबाराव थोरात, अरुणराव जोशी, नारायण पळसे, गणपत आप्पा सातपुते, मोहनराव आठवे, रामदास सोळंके,दादाराव चौरे, शत्रुघ्न कणसे, मधुकर मोरे, अनंता आगलावे, बबलु सातपुते,बळीराम थोरात,बाळासाहेब फुलारी,नसरूल्ला काकड,अल्ताफ कुरेसी, दीपक सातपुते, प्रकाश सातपुते महादेव वाघमारे, बाळासाहेब पवार, माउली सोळंके,राजेश दवंडे,बब्बू शेख आदि उपस्थित होते

दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न
7 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र

वाचा ↗
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत
6 सप्टेंबर 2026Shamsundar chittoda

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

परतूर, प्रतिनिधी : संतोष शर्मा कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची

वाचा ↗
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी
5 ऑगस्ट 2026Shamsundar chittoda

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मा

वाचा ↗
📡आपण ऑफलाइन आहात